Komal Dhoble-Praniti Shinde : भाजपकडून इच्छूक असलेल्या ढोबळेंच्या कन्येने केले प्रणिती शिंदेंचे कौतुक

Solapur Lok Sabha Election Result : राजकारणात नवी कोरी पाटी असलेल्या कोमल ढोबळेही चांगले आव्हान देऊ शकल्या असत्या, असाही काहींचा दावा आहे.
komal Dhoble-Praniti Shinde
komal Dhoble-Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha,05 June : भाजपकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या ॲड कोमल ढोबळे-साळुंखे यांनी सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार, काँग्रेसच्या विजयी उमेदवार प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन केले.

सोलापूरच्या (Solapur) मागील दोन खासदारांची दहा वर्षांतील कामगिरी निराशाजनक ठरल्याची तक्रार असताना भाजपने (BJP) जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांचा कौल घेऊन या वेळी उमेदवार निश्चित करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता निवडक लोकप्रतिनिधींचा विचार घेऊन आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली. त्याचवेळी भाजपकडून उमेदवारीसाठी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, त्यांची कन्या ॲड कोमल ढोबळे-साळुंखे (Komal Dhoble) हेदेखील इच्छूक होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजकारणात नवी कोरी पाटी असलेल्या कोमल ढोबळेही चांगले आव्हान देऊ शकल्या असत्या, असाही काहींचा दावा आहे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सोलापूरचे पालकमंत्री म्हणून काम केल्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्याशी त्यांचा संबंध आला आहे. त्यांचा जनसंपर्कही चांगला होता. याशिवाय त्यांना मतदारसंघाची पूर्ण ओळख होती. मात्र भाजपने त्यांना उमेदवारीत डावलले.

खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे अक्कलकोट तालुक्याचे रहिवासी असल्यामुळे त्यांना गत निवडणुकीत 45 हजारपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते. यंदाही ढोबळे यांना उमेदवारी मिळाली असती तर अक्कलकोट तालुक्यातून स्थानिक रहिवासी म्हणून चांगले मताधिक्य मिळाले असते. मात्र, राम सातपुते यांना दहा हजाराच्या आसपास मताधिक्य मिळाले. उमेदवारीत डावलले. तसेच, पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून त्यांना सातत्याने डावलले जाते, अशी खंत कोमल ढोबळे व्यक्त करतात.

komal Dhoble-Praniti Shinde
Karmala Assembly Election : करमाळ्यात मोहिते पाटलांना लीड; आमदार संजय शिंदेंना धोक्याचा इशारा

काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी निश्चित केल्यानंतर भाजपकडूनही महिला उमेदवाराबाबत विचार व्हायला हवा होता, अशी चर्चा त्यावेळी होती. त्याकडे नेतृत्वाने दुर्लक्ष केले. केंद्रात अणि राज्यात सत्ता, सोलापूर जिल्ह्यात पक्षाचे पाच आमदार असूनही एकट्या प्रणिती शिंदे यांनी 74 हजारांचे मताधिक्क्य घेत विजय संपादन केला. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या ॲड. कोमल ढोबळे यांनीही प्रणिती शिंदे यांचे अभिनंतदन करत विजयाबद्दल त्यांचे कौतुक केले

komal Dhoble-Praniti Shinde
Babanrao Shinde : मोहिते पाटलांनी माढ्यात वाढवली शिंदेंची धाकधूक....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com