

MLC Election : सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत पंढरपूर नगरपालिकेतील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या 9 नगरसेवकांनी भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केलेल्या अनिल सावंत यांच्या नेतृत्वात नगरसेवकांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली. गोरेंचे राजकीय विरोधक आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
पंढरपूर नगरपालिकेत 36 पैकी भाजपचे 20, माजी आमदार प्रशांत परिचारक प्रणित पंढरपूर मंगळवेढा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 4, एक अपक्ष आणि भगीरथ भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 13 नगरसेवक आहेत. तर प्रणिती भालके नगराध्यक्षा आहेत. या निवडणुकीवेळी भालकेंनी पालकमंत्री गोरे यांना थेट आव्हान दिले होते. शिवाय भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शामल शिरसट यांचा तब्बल 11 हजार मतांनी पराभव केला होता.
त्या निवडणुकीपासूनच जयकुमार गोरे कधी ना कधी भालके यांचे उट्टे काढणार अशी चर्चा सुरु होती. अखेर त्यांनी तीर्थक्षेत्र आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. शिवसेना नेते तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली 9 नगरसेवकांनी जयकुमार गोरे यांची भेट घेतली. या सर्व नगरसेवाकांनी भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. आता मतदान होईपर्यंत गोरे अजून किती धक्के देतात हे पाहावे लागेल.
पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या काळात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ‘भालकेजी, तुम्ही निवडून आल्यानंतर निधी कुठून आणणार आहात. माझ्याकडंच यावं लागणार आहे,' अशी टीका केली होती. त्यावर शिवसेना प्रवेशावेळी भालके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत "आरं निधी देणारा हा माणूस इथं आहे, इथं बघ येऊन, असे म्हणत खणखणीत उत्तर दिले होते. त्यावर ज्या दिवशी डोक्यावरून जाईल, त्या दिवशी सगळं सांगेन, असा गर्भित इशारा गोरे यांनी दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.