Rahul Sarvade Passes Away : काशीराम यांचे निकटवर्तीय बसपाचे माजी केंद्रीय सचिव राहुल सरवदे यांचं निधन

Rahul Sarvade Passed Away : राहुल सरवदे यांनी बहुजन समाज पार्टीच्या स्थापनेपासून बहुजन समाज पार्टीचे संस्थापक काशीराम तथा राष्ट्रीय अध्यक्ष मायावती (Mayawati) यांच्यासोबत काम केलं आहे.
Rahul Sarvade Passes Away
Rahul Sarvade Passes AwaySarkarnama

Solapur News : बहुजन समाज पार्टीचे माजी केंद्रीय सचिव आणि निष्ठावंत भिमसैनिक राहुल सरवदे यांचं सोलापुरात निधन झालं आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 65 वर्षांचे होते.

सरवदे (Rahul Sarvade) यांची अंत्ययात्रा सोलापुरातील (Solapur) बुधवार पेठेतील त्यांच्या निवासस्थानापासून सायंकाळी चार वाजता निघणार आहे. सरवंदे हे आंबेडकरी चळवळीतील सोलापुरातील ते ज्येष्ठ नेते होते. एक निष्ठावंत भिमसैनिक अशी त्यांची ओळख सर्वत्र होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बहुजन समाज पार्टीमध्ये (Bahujan Samaj Party) काम करताना त्यांनी अनेक पदं भूषवली. तर त्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक देखील लढवली होती. राहुल सरवदे हे अत्यंत कणखर, स्पष्टवक्तेपणा, रोखठोक स्वभाव आणि सर्वसामान्यांसाठी झटणारे नेतृत्व होतं.

राहुल सरवदे यांनी बहुजन समाज पार्टीच्या स्थापनेपासून बहुजन समाज पार्टीचे संस्थापक काशीराम तथा राष्ट्रीय अध्यक्ष मायावती (Mayawati) यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांच्या जाण्याने बहुजन समाज पार्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Rahul Sarvade Passes Away
Pune Hit And Run Case Update : रक्ताचे सॅम्पल बदलण्यासाठी डाॅक्टर आणि 'बाळा'च्या बापामध्ये 'एवढ्या' वेळा फोन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com