Asaduddin Owaisi : ...अन् ओवैसींना सभा सुरू असतानाच सोलापूर पोलिसांनी स्टेजवरच दिली नोटीस!

Solapur Police issues notice to Asaduddin Owaisi : जाणून घ्या, यावर ओवैसींनी नेमकं काय केलं? ; या घटनेची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.
Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiSarkarnama
Published on
Updated on

Asaduddin Owaisi at Solapur Rally: एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांना सोलापूर पोलिसांनी नोटीस दिली. विशेष म्हणजे ओवैसींची सभा सुरू असतानाच स्टेजवर चढून पोलिसांनी त्यांना ही नोटीस दिली. यामुळे हा प्रसंग चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, प्रचारावेळी प्रक्षोभक भाषण टाळावीत, नियमांचे पालन करावे अशा नोटीस उमेदवारांना त्यांच्या कार्यालयात किंवा घरी पाठवल्या जातात. मात्र ओवैसींना ही नोटीस स्टेजवर दिली गेली.

खासदार ओवैसी सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवार फारूख शाब्दी यांच्या प्रचारसभेसाठी आले होते. यावेळी त्यांचे भाषण सुरू असताना पोलिसांनी स्टेजवर चढून त्यांना नोटीस दिली. भाषणामुळे कोणत्याही समाजाच्या भाषणा दुखावतील अशी भाषा वापरू नये, अशा आशयाची ही नोटी होती. यावर ओवैसींनी नोटीस मराठीत असल्याने फोटो काढला आणि त्याची इंग्रजीमधील प्रत मागवली.

दरम्यान सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. कारण, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत पठाण यांनी एमआयएम उमेदवारास पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातून शौकत पठाण हे स्वत: निवडणुकीसाठी इच्छुक होते, मात्र त्यांना काँग्रेसने तिकीट नाकारल्याने ते नाराज होते. परिणामी त्यांनी ओवैसींसमोर थेट स्टेजवरूनच एमआयएम उमेदवार फारूख शाब्दींना पाठिंबा जाहीर केला.

Asaduddin Owaisi
Eknath Shinde on MVA : '...त्यासाठीच आम्ही महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकली' ; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

 राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रत्येक पक्षाकडून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या निवडणुकीत जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. अशातच आता आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी भारत देश हा जितका टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच तो दाढी असणाऱ्याचांही असल्याचं वक्तव्य केलं होतं.

Asaduddin Owaisi
Chitra Wagh and Sanjay Rathod News : संजय राठोडांच्या प्रचारासाठी चित्रा वाघ जाणार का? ; जाणून घ्या, त्यांचं रोखठोक उत्तर!

तर राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना हिंदुत्त्व शिकवण्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यशस्वी झाले का? अजित पवारांनी आपल्या भ्रष्टाचाराचा अभ्यास मोदी आणि योगी यांना शिकवलं का?" अशा शब्दात त्यांनी युती आाघाडीवर टीका केली. तसेच मला मुस्लिम असल्याचा गर्व आणि अभिमान आहे. मी हिंदुस्थानी आहे. असं त्यांनी म्हटलं होतं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com