Umesh Paricharak Mangalvedha : सोलापूरच्या राजकारणात नव्या चेहऱ्याचा उदय? उमेश परिचारकांना आमदार म्हणून शुभेच्छा !

Solapur Politics : बदलत्या राजकीय स्थितीत पंढरपूर-मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ
Umesh Paricharak
Umesh Paricharak Sarkarnama

Solapur News : पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीचे आणि शुगर या साखर कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक हे पंढरपूर विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना त्यांच्या समर्थकांनी आमदार म्हणत शुभेच्छा देवून सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. या पोस्टमुळे आगामी काळातील पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेत मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे बोलले जात आहे. बदलत्या राजकीय स्थितीत सोलापूरच्या राजकारणात नवीन चेहऱ्याचा उदय होणार असल्याची चर्चा सोलापूरात सुरू झाली आहे. (Latest Political News)

विधानसभा २०१४च्या निवडणुकीत प्रशांत परिचारक यांचा तर २०१९ मध्ये सुधाकर परिचारकांचा पराभव झाला होता. त्यावेळची आणि आत्ताची राजकीय परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. विधानसभेच्या २०२१च्या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांना आमदार करण्यात माजी आमदार प्रशांत परिचारक व उमेश परिचारकांनी पंढरपूर तालुक्यामध्ये मोठे कष्ट घेतले. परंतु त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आमदार अवताडेंपासून फारकत घेत समविचारी आघाडीच्या माध्यमातून दामाजी कारखान्याची निवडणूक लढवून बाजी मारली.

दरम्यान, गेल्या दहा वर्षात परिचारक समर्थक मंगळवेढ्यात आपला गट विस्तारण्यात अयशस्वी ठरले असले तरी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटलांना तालुक्यामध्ये गट विस्तारण्यात संधी मिळाली. त्याचा ते कितपत लाभ घेतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Umesh Paricharak
Onion Political Role : गल्ली ते दिल्ली, सर्वच राजकारण्यांचा कांद्यानं केला वांदा ! आतापर्यंत कुणाकुणाला रडवलं...

आता तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये शरद पवार व अजित पवार असे दोन गट आहेत. राष्ट्रवादीतील गटाबाजीमुळे पक्षाची मते विभागणार आहेत. यातच लाखापेक्षा अधिक मते घेणारे राष्ट्रवादीचे भगीरथ भालकेंनी बीआरएस ची वाट धरली आहे. परिणामी या मतदारसंघात मोठी मत विभागणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या परिस्थितीत युटोपियन कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारकांना शुभेच्छा देताना समर्थकांनी २०२४चे आमदार अशा उल्लेख केला आहे. यामुळे ते विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा तालुक्यात जोर धरू लागली आहे. याबाबत उमेश परिचारकांनी कुठलीही भूमिका जाहीर केले नसली तरी समर्थकांनीच त्यांच्या नाव पुढे नेले जात असल्याने आगामी काळात तालुक्यात आणखी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Umesh Paricharak
Amol Kolhe Reply: आढळरावांची 'ती' टीका खासदार अमोल कोल्हेंना झोंबली; म्हणाले, '' त्यांच्या वयामुळे....''

मंगळवेढ्यात कारखानदारी व बँक यामुळे परिचारकांचे राजकीय वर्चस्व आहे. प्रशांत परिचारकांनी सध्या भाजपशी सलगी वाढवली आहे. पक्षीय राजकारणापेक्षा त्यांचे स्वतःचे गट आहेत. ते जिल्ह्याच्या राजकारणामध्ये प्रभाव टाकू शकतात, परंतु अलीकडे पक्षश्रेष्ठीने परिचारकांच्या राजकीय वर्चस्वाची दखल घेतली नसल्याने त्यांच्या गोटात नाराजी आहे. परिचारकांना डावलणे हे देखील पक्षाला भविष्यात धोक्याचे ठरणार आहे. परिचारकांच्या दोन्ही तालुक्यात असलेल्या मतदारांमध्ये विभागणी झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून निवडणूकच लढवावी अशी भूमिका घेतली जात आहे. ते या मतदारसंघात निर्णायक पाऊल टाकू शकत असल्याने आता त्यांच्या भूमिकेकडे तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com