Amol Kolhe Reply: आढळरावांची 'ती' टीका खासदार अमोल कोल्हेंना झोंबली; म्हणाले, '' त्यांच्या वयामुळे....''

Amol Kolhe Reply To Aadhalrao Patil: '' वयस्कर आणि ज्येष्ठ नेते असल्याने आपण जरुर मार्गदर्शन करावे, ते...''
Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe Latest News
Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe Latest NewsSarkarnama

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad : शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हेंचे नाव न घेता शनिवारी त्यांना जोरदार टोला लगावला होता. खासदार झालो म्हणजे मी मोठा झालो, चाललो शुटिंगला,असे म्हणत खासदारांना डिवचले होते. त्या टीकेवर आता कोल्हेंनी सणसणीत पलटवार करताना थेट आढळरावांचे वयच काढले आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे( Amol Kolhe ) यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधतानाच शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलां(Shivajirao Aadhalrao Patil)वर निशाणा साधला.

Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe Latest News
Congress CWC News : काँग्रेस लागली कामाला; टीम खर्गे सज्ज : तरुण नेत्यांवर मोठी जबाबदारी

कोल्हे म्हणाले, वयस्कर आणि ज्येष्ठ नेते असल्याने आपण जरुर मार्गदर्शन करावे, ते घ्यायला नक्की आवडेल,असे कोल्हे आढळरावांना उपरोधिकपणे म्हणाले. त्याचवेळी त्यांच्या वयाचा तीनवेळा उल्लेख करीत त्यामुळे त्यांना विस्मरण होत असावे, अशी त्यांनी कोपरखळीही मारली.

खासदार झाल्यानंतरही शुटिंग करीत असल्याच्या आढळरावांच्या आरोपाचा २०१९ पासून कोणत्या पद्धतीचे चित्रीकरण मी केले याचा माझ्या टीकाकरांनी (आढळराव) विचार केला असता,तर बरे असते,असा समाचार कोल्हेंनी घेतला. पण, वयामुळे त्याचे त्यांना विस्मरण झाले असावे,असा टोलाही त्यांनी त्यावर लगावला.

Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe Latest News
Balu Dhanorkar News : ...अखेर खासदार बाळू धानोरकरांचं 'ते' स्वप्नं त्यांच्या स्वीय सहाय्यकानं केलं पूर्ण!

या चित्रीकरणातून छत्रपतींचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचे काम मी करत असून त्यामुळे कोणाच्या पोटात दुखत असेल,तर त्याचे शल्य,वैषम्य वाटते,असे ते म्हणाले.पण,ते माझं आद्यकर्तव्य असून ते मी पार पाडणारच असेही त्यांनी नि:क्षून सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com