Udayanraje Bhosale : उदयनराजेंच्या विजयात सैनिकांचाही वाटा, कोणी दिलं श्रेय?

Udayanraj Victory : महायुती व खासदार उदयनराजेंवर प्रेम करणारे सर्वसामान्य मावळे यांच्या उस्फुर्त कामगिरीच्या जोरावर हा ऐतिहासिक विजय झाला आहे, असे सुनील काटकर म्हणाले.
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale Sarkarnama

Satara Lok Sabha News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी निर्विवाद विजय मिळवला आहे. हा विजय सर्व जिल्ह्यातील आमदार, ज्येष्ठ नेते यांचे मार्गदर्शनाखाली भाजप व मित्र पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व विधानसभा प्रमुख, सर्व विस्तारक, बूथ प्रमुख विधानसभा समन्वयक व विशेषतः सर्व पक्षांच्या महिला आघाडी पदाधिकारी यांनी घेतलेल्या कष्टाचे फलित आहे, असे स्पष्ट मत भाजपचे सातारा लोकसभेचे संयोजक सुनील काटकर यांनी व्यक्त करत सैनिकांच्या पोस्टल मतदानाचाही उदयनराजे भोसले यांच्या विजयात वाटा असल्याचे म्हटले आहे.

सुनील काटकर यांनी म्हटले की, या निवडणुकीला सामोरे जात असताना भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची भूमिका बजावत असणारे सर्व शहरातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष नगरसेवक तसेच ग्रामीण भागातील सर्व आजी-माजी सभापती ,जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांच्यासह मतदारांना बूथपर्यंत पोचवण्याची जबाबदारी पार पडणारे महायुती व खासदार उदयनराजेंवर प्रेम करणारे सर्वसामान्य मावळे यांच्या उस्फुर्त कामगिरीच्या जोरावर हा ऐतिहासिक विजय झाला आहे.

सातारकरांनी विजयोत्सव साजरा करण्याची संधी दिली आहे. तसेच वेगवेगळ्या आघाड्यावरती काम करत असताना सैनिक, शिक्षक ,वकील, डॉक्टर ,कामगार ,उद्योग ,दलित संघटना यासारख्या विविध संघटनांनी दिलेले योगदान हे या विजयाप्रति मैलाचा दगड ठरले. याशिवाय पोस्टल मतदानाद्वारे जिल्ह्यातील सैनिकांनी आपली जबाबदारी चोख बजावत खासदार उदयनराजेंना भरघोस असे मतदान केले आहे, असे काटकर यांनी सांगितले.

Udayanraje Bhosale
Shashikant Shinde : 'कुणाला जर वाटत असेल मी संपलो, पण आता..' ; पराभवानंतरही शशिकांत शिंदेंचा कॉन्फिडन्स कायम!

त्या सैनिकाप्रति कृतज्ञता व्यक्त करून या निवडणुकीत हस्ते परहस्ते व ज्ञात अज्ञात नागरिकांकडून झालेले सहकार्य हे देखील तेवढ्याच तोला मोलाच असून खासदार उदयनराजे भोसले यांचे आम्ही सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त करतो, असे काटकर यांनी म्हटले आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com