उद्धव ठाकरेंना कुणीतरी चुकीचं ब्रिफिंग करतयं..शंभूराज देसाईंनी स्पष्टच सांगितले...

Uddhav Thackeray : पांडूरंगाच्या दर्शनासाठी कर्नाटकात जायचं का?
Uddhav Thackeray, Shambhuraj Desai Latest News
Uddhav Thackeray, Shambhuraj Desai Latest News sarkarnama
Published on
Updated on

Karnataka Border Dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी केलेल्या विधानामुळे जुन्या वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. बोम्मईंनी सोलापूर आणि अक्कलकोटवर दावा केल्याने राज्यातील विरोधीपक्षांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Uddhav Thackeray, Shambhuraj Desai Latest News )

Uddhav Thackeray, Shambhuraj Desai Latest News
पंजाबप्रमाणे गुजरातमध्ये देखील केजरीवालांचं भाकीत खरं ठरणार का?, कागदावर दिलं 'हे' लिहून

दरम्यान, शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुलढाण्यात झालेल्या सभेत बोलताना सत्ताधाऱ्यांना आणि त्यातही शिंदे गटाच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. गुजरात प्रकल्प पळवतोयं आता कर्नाटक आपलं सोलापूर आणि स्वामी समर्थांच्या अक्कलकोटवर दावा करत आहे. मग काय आम्ही पांडूरंगाच्या दर्शनासाठी कर्नाटकात जायचं का?,असा सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. त्यांच्या या टिकेवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रत्युत्तर दिले असून पंढरपूर कर्नाटकात जातयं ही माहिती कुणीतरी ठाकरेंना चुकीची दिली असल्याचे म्हटले आहे.

Uddhav Thackeray, Shambhuraj Desai Latest News
नाशिक अनाथाश्रमातील मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणी मंत्री लोढांनी सचिवांना दिला सात दिवसांचा अल्टिमेटम

शंभूराज देसाई म्हणाले, उद्धव ठाकरेंना कुणी सांगितले की पंढरपूर कर्नाटकमध्ये जातयं? त्यांना कुणी ब्रिफिंग कुणी दिले मला माहित नाही. मात्र उद्धव ठाकरेंकडे कुणी तरी चुकीची माहिती दिली आहे. त्यांनी माहिती पडताळून मग बोलावे. आम्ही महाराष्ट्राची एक इंचही जमीन महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही. हायपॉवर कमिटीची बैठक झाल्यानंतर तातडीचा 10 कोटींचा निधी सीमावर्ती भागातील मराठी लोकांसाठी आपण दिला आहे, असे मत देसाईंनी व्यक्त केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, द्रकांत पाटील आणि मी 3 डिसेंबरला बेळगावला जात आहोत. सीमावर्ती भागातील संघटना आहेत त्या प्रमुख लोकांशी चर्चा आम्ही करणार आहोत. स्थानिक लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही जाणून घेणार असून समवयक मंत्री म्हणून आमची न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी आहे. जेव्हा वेळ निश्चित होईल तेव्हा मी आणि चंद्रकांत पाटील दिल्लीत जाऊ. आपल्या मराठी लोकांना काय सुविधा देता येतील याबाबतही आम्ही चर्चा करणार आहोत. विरोध काही असला तरी आम्ही दोन राज्यामधील वाद मिटवण्यासाठी समन्वयक म्हणून जाणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com