Somnath Vaidya : 'दक्षिण सोलापूर'मध्ये सोमनाथ वैद्यांकडून गावोगावी, शहरात महाप्रसाद, छत्री वाटपाचा धडाका

Somnath Vaidya Vidhan Sabha Election : मतदारसंघात 51 हजार बेसन लाडू आणि गरजूंना छत्री वाटप, गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे. आता श्रावण महिन्यात विविध मंदिर व मठामध्ये महाप्रसाद वाटप करीत आहोत.
South Solapur Somnath Vaidya
Somnath VaidyaSarkarnama
Published on
Updated on

Solapur Vidhan Sabha Election : स्वयंम् शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य (Somnath Vidya) यांच्यावतीने गावोगावी आणि शहरातील विविध मंदिरात श्रावण महिन्यात प्रवचन संपल्यानंतर स्वादिष्ट भोजन म्हणून महाप्रसाद वाटप करण्यात सपाटा लावला आहे.जनतेचे आशीर्वादासाठी, सामाजिक बांधिलकी जपण्याकरिता आणि पुण्य लाभण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवित आहेत असं सांगितले जात आहे.

मंद्रूप येथील श्री मंदगोडेश्वर सिध्द आश्रमात आयोजित प्रवचनाला वैद्य उपस्थित होते. यावेळी अमोगसिध्द पुजारी, कांतू ख्याडे, विठ्ठल राठोड, सिध्दाराम काळे, मल्लिकार्जुन नंदुरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सोमनाथ वैद्य म्हणाले, अतिशय गरीब कुटुंबातून आपण स्वकर्तृत्वावर जीवनात पुढे आलो आहोत.आपल्याला समाजाची सेवा करायची आवड आहे.

गेल्या 19 वर्षापासून आपण मुंबईतील मंत्रालयात अनेक आमदारांचे स्वीय सहायक म्हणून काम केले आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न, गावोगावच्या समस्या कसे सोडवायचे आणि त्यांचा पाठपुरावा कसा करावा याचा आपल्याला मोठा अनुभव आहे. सध्या आपण गोड सुरुवात म्हणून मतदारसंघात 51 हजार बेसन लाडू आणि गरजूंना छत्री वाटप, गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे. आता श्रावण महिन्यात विविध मंदिर व मठामध्ये महाप्रसाद वाटप करीत आहोत.

South Solapur Somnath Vaidya
Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना सुरु ठेवायची असेल, तर फडणवीस CM व्हायला हवं...'; भाजप मंत्र्यांचं मोठं विधान

आपण सोलापूर (Solapur) दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहोत. जर जनतेनी आपल्याला संधी दिली वडापूर येथे भीमा नदीवर धरण, सीना-भीमा नदीवरील बंधार्‍यांची उंची वाढवू, कालव्याची दुरूस्ती करून जिथे कालवे नाहीत अशा ठिकाणी नवीन कालवे निर्माण करू. मंद्रूपला तालुका म्हणून घोषित करून येथे उच्च शिक्षणाची सुविधा, उपबाजार समिती, उच्च दर्जाची आरोग्यसेवा पुरविण्याचा संकल्प केला आहे.

दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील गावोगावी आणि सोलापूरात रस्ते, वीज, पाणी आरोग्य, शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जनतेनी एकदा सेवेची संधी दिली तर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात राज्यात आदर्श मतदारसंघ निर्माण करू असे त्यांनी बोलताना सांगितले.

South Solapur Somnath Vaidya
Somnath Vaidya : दक्षिण सोलापुरातून मंत्रालय प्रशासनातील अनुभवी माणूस रिंगणात; सोमनाथ वैद्य यांची निवडणुकीपूर्वी जोरदार चर्चा

सरपंच, सदस्य, नगरसेवक, पुढारींना अधिवेशनाला नेणार!

आपण आमदार म्हणून निवडून आल्यावर दक्षिण सोलापूर व‌ उत्तर तालुक्यातील 67 सरपंच व सदस्य आणि जुळे सोलापूरातील नगरसेवकांना तसेच गावातील पुढारींना नागपूर व मुंबई येथे होणाऱ्या अधिवेशनाला सोबत घेऊन जाऊन‌ त्यांना प्रशासकीय कामकाजाची माहिती देणार आहोत. तसेच त्यांच्या गावातील, शहरातील समस्या संबंधित मंत्री महोदयांसमोर मांडून जागेवरच समस्या सोडविणार आहोत.या दौऱ्यामुळे त्यांना कामकाजाची माहिती होऊन त्यांना त्यांचा उपयोग गावात व शहरात कामकाज करताना होणार आहे.

मी आमदार झाल्यावर सर्व सामान्य जनतेचा पी.ए.म्हणूनच म्हणूनच काम करेन आणि जनता जनार्दनच तालुक्याचे आमदार असेल. मी मितभाषी असून जनतेशी आपुलकीने वागत असल्याने यापुढील काळात ही जनतेशी प्रेमाने वागेन. कधीही उर्मट वागणार नाही असे आपण वचन देतो. तेव्हा जनतेने मला एकदा आमदारकी पदी संधी द्यावी, आपण सोलापूर दक्षिण विधानसभेचा विकास साधून कायापालट करू अशी ग्वाही सोमनाथ वैद्य यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com