जयंत पाटलांवर शेलक्या भाषेत टीका, पडळकरांवर बापू बिरू वाटेगावकरांचा मुलगा भडकला; म्हणाला, 'अंगावर चड्डी सुद्धा...'

Son of Bapu Biru wategaonkar On Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर सांगलीसह राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे.
BJP gopichand padalkar, Bapu Biru wategaonkar And jayant patil
BJP gopichand padalkar, Bapu Biru wategaonkar And jayant patilsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले.

  2. यावरून सांगलीत राष्ट्रवादीने आंदोलन करत निषेध नोंदवला.

  3. शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांना थेट इशारा देत आक्रमक भूमिका घेतली.

Sangli News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल पातळी सोडून भाष्य केले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर आता राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. सांगलीतही गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन केले जात असून पडळकर यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. यादरम्यान बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांवर जोरदार निशाना साधला असून इशारा ही दिला आहे. त्यांनी पडळकराना, जयंत पाटलांच्या नादाला लागू नको, तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही, असा दम भरला आहे.

पडळकर यांनी जयंत पाटलांच्याबाबत अश्लाघ्य भाषा वापरत टीका केली होती. पडळकर यांनी, जयंत पाटील हा बिनडोक माणूस असून त्याला काही अक्कल नाही. जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद आहेत, असे वाटत नाही असं म्हणत शेलक्या शब्दात जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका केली होती. या वक्तव्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून राष्ट्रवादीही चांगलीच आक्रमक झाली असून पडळकरांचा निषेध व्यक्त केला जात आहे.

अशातच आता इस्लामपूर, जत, सांगली, विटा आदी ठिकाणी पडळकर यांच्याविरोधात जोरदार आंदोलने केली जात आहेत. बापू बिरू वाटेगावकरांच्या मुलानं देखील पडळकरांना दम भरला आहे. शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांना सज्जड दम भरताना, पडळकर वाळवा तालुक्यात येच तुझे कपडे काढूनच पाठवतो, असा इशारा दिला आहे.

BJP gopichand padalkar, Bapu Biru wategaonkar And jayant patil
Jayant Patil Vs Gopichand Padalkar : जयंत पाटलांना नडले, पवारांना भिडले... मातब्बर नेत्यांविरोधात गोपीचंद पडळकरांचं राजकारण कसं उभं राहिलं?

तसेच वाटेगावकर म्हणाले, अरे टोपीचंद संत बाळूमामा व बापू बिरु यांच्या नावाने तू राजकारण करतोस.. त्यांनी समाजासाठी काय काम केले ते बघं आणि तु समाजासाठी काय करतोस, ते बघ? आम्ही बोलतो थोडकच बोलतो पण कार्यक्रमच करतो. जयंत पाटालांविरूद्ध काहीतरी बोलतो.

पडळकर काहीतरी वायचळ बोलतो. जयंत पाटालांविरूद्ध काहीतरी बोलतो. तो माणूस तुला काही आलतू फालतू वाटला का, तू कदाचित या वाळवा तालुक्यात यायचा विचार कर तुझे कपडे काढूनच पाठवतो. तू जत तालुक्यातून निवडून येऊन दाखवच. तुला समाजात काही काडीचीही किंमत नाहीत. तालुक्यातीलच नाही तर राज्यातील धनगर समाजाला त्यानं मान खाली घालायला लावली.

तो माणूस तुला काही आलतू फालतू वाटला का? नको त्या माणसाच्या नादाला लागू नको, तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही. बापूंसारख्यांवर बोलायला एवढा मोठा झाला का तू...? आता त्याला नावाने हाक मारूही शकत नाही. कारण त्याची लायकी नाही, समाजात काही काडीचीही किंमत नाही, अशीही टीका वाटेगावकर यांनी केली आहे. सध्या वाटेगावकर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

BJP gopichand padalkar, Bapu Biru wategaonkar And jayant patil
Gopichand Padalkar टीकेवर यांच्या टीकेवर Jayant Patil काय म्हणाले पाहा ?

FAQs :

1. वादग्रस्त वक्तव्य कोणी केले?
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी.

2. कोणाच्या विरोधात वक्तव्य केले गेले?
राष्ट्रवादी नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात.

3. राष्ट्रवादीने कुठे आंदोलन केले?
सांगलीत.

4. पडळकरांना इशारा कोणी दिला?
शिवाजी वाटेगावकर (बापू बिरू वाटेगावकर यांचे पुत्र).

5. आंदोलनाचे कारण काय होते?
जयंत पाटील यांच्याबाबत पडळकरांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com