Satara NCP Political News : सातारा राष्ट्रवादीत उभी फूट! अजितदादांच्या बंडाला रामराजे,मकरंद पाटलांची साथ तर...

Maharashtra Politics : सातारा जिल्हा हा शरद पवारांना मानणारा जिल्हा असून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो.
Satara NCP Political News
Satara NCP Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Satara : राज्याच्या राजकारणात रविवारी (दि.२) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंड करत ते शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अचानक झालेल्या त्यांच्या शपथविधीने सर्वांना धक्का दिला. सातारा जिल्हा हा खासदार शरद पवार यांना मानणारा जिल्हा असून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीत ही उभी फूट पडल्याचं समोर येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar)यांच्या बंडाला रामराजे नाईक निंबाळकर, मकरंद पाटील, दीपक चव्हाण यांनी साथ दिली आहे तर आम्ही पवार साहेबांसोबतच अशी भूमिका खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे सातारा बालेकिल्ला दादा व साहेब गटात विभागला आहे. याचे परिणाम आगामी निवडणुकात पाहायला मिळणार आहे.

Satara NCP Political News
Kirit Somaiya News : किरीट सोमय्यांचा 'अभ्यास' पुन्हा पाण्यात..! १२ महिन्यांत दोनदा बदलला अभ्यासक्रम...

सातारा हा राष्ट्रवादी(NCP)चा 1999 पासून बालेकिल्ला आजतागायत अबाधित राहिला आहे. पण अजित पवार यांच्या बंडानंतर सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अजित पवार यांच्यासोबत फलटणचे राजे आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, आणि वाईचे आमदार मकरंद पाटील हे सहभागी झाले होते.

तर खासदार शरद पवार यांच्यासोबत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांनी राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सातारा जिल्हा राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. आता आगामी काळात जिल्ह्यातील आणखी कोणकोण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणार याची उत्सुकता आहे.

Satara NCP Political News
Maharashtra Politics: शपथविधी अजितदादांचा पण चर्चा अमोल मिटकरींची; कॅमेऱ्यापासून हाताने लपवला चेहरा

दरम्यान. सोमवार(दि.३) चा दिवस जाऊ देत त्यानंतर सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील सर्वजण पुन्हा एकत्र शरद पवारां(Sharad Pawar)च्या सोबत पाहायला मिळतील असे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगत आम्ही पवार साहेबांची साथ सोडणार नाही असे स्पष्ट केले. तर पवार साहेब घेतील त्या निर्णयासोबत आम्ही राहू असे आमदार बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मंत्र्यांच्या शपथविधीची नावे राज्यपालांना कळविताना पहिल्या यादीमध्ये आमदार मकरंद पाटील यांचे नाव कॅबिनेट मंत्री म्हणून सुचविण्यात आले होते. मात्र, नाव नसल्याने मकरंद पाटील यांनी वाई विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून मगच अजितदादांसोबत जाण्याचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com