Maharashtra Politics: शपथविधी अजितदादांचा पण चर्चा अमोल मिटकरींची; कॅमेऱ्यापासून हाताने लपवला चेहरा

Amol Mitkari : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी माध्यमांचा कॅमेरा पाहताच तोंड लपवलं.
MLA Amol Mitkari
MLA Amol MitkariSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Joins Shivsena-BJP Government : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह अजून काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. अजित पवार यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे हे देखील आहेत.

अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे 35 पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली यावेळी छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदारही उपस्थित होते. याचवेळी राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरीही होते. मात्र, माध्यमांचा कॅमेरा पाहताच अमोल मिटकरी यांनी तोंड लपवण्याचा प्रयत्न केला.

MLA Amol Mitkari
Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजितदादा; आता '33 टक्के एकदम ओके'

अजित पवार यांनी भाजपबरोबर जावून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे अमोल मिटकरी यांची मोठी गोची झाल्याची चर्चा आहे. कारण ते भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका करताना पाहायला मिळत होते. पण अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी अमोल मिटकरीही राजभवनात हजर होते.

MLA Amol Mitkari
Maharashtra politics : शिंदे गटातील आमदारांनी शिऊन ठेवलेले कोट तसेच; घडले भलतेच : राष्ट्रवादीचेच झाले नऊ मंत्री

याचवेळी तेथे एका वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी कॅमेरा घेऊन अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले असता यावेळी अमोल मिटकरी यांनी हाताने तोंड झाकून घेत तोंड लपवण्याचा प्रयत्न केला. तसेच हसत हसत "अजित पवार हे आमच्या पक्षाचे नेते आहेत, काय बोलावं..हे सगळे लोकं समोर पाहतोय...", असं म्हणत कॅमेऱ्यापासून बचाव करत आपला हात डोक्यावर आणि तोंडावर ठेवत चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अमोल मिटकरींनी केलेल्या या कृतीची सध्या मोठी चर्चा रंगली आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com