Tushar Patil Passes Away : दौंडच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पेपरफुटी प्रकरणात ठपका ठेवलेल्या अधिकाऱ्याचे निधन

SRPF Commandant Tushar Patil Passes Away : तुषार पाटील यांनी पोलिस उप अधीक्षक म्हणून कोल्हापूर, रत्नागिरी व मुंबई येथे वाहतूक विभागात सेवा केली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी सिंधूदूर्ग, रत्नागिरी, पुणे लोहमार्ग पोलिस दल येथे सेवा केली होती.
SRPF Commandant Tushar Patil
SRPF Commandant Tushar Patilsarkarnama
Published on
Updated on

Pune/Kolhapur News : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचचे समादेशक तुषार पाटील ( वय ४९) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. १७ मे १९६५ रोजी स्थापन झालेल्या गट क्रमांक पाचचे ते पन्नासावे समादेशक होते. पुणे येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना ७ जून रोजी तुषार पाटील यांचे निधन झाले.

तीन दिवसांपूर्वी मूत्रपिंडाच्या उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता त्यांची तब्यत खालावली. अति दक्षता विभागात असताना मूत्रपिंडाचा विकार गुंतागुंतीचा होऊन निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचचे पन्नासावे समादेशक म्हणून तुषार पाटील यांनी १६ जुलै २०२५ रोजी पदभार स्वीकारला होता.

कोल्हापूर येथे नागरी हक्क संरक्षण विभागाच्या अधीक्षक पदावरून दौंड येथे समादेशक तथा पोलिस अधीक्षक म्हणून तुषार पाटील यांची बदली झाली होती. तुषार पाटील यांनी पोलिस उप अधीक्षक म्हणून कोल्हापूर, रत्नागिरी व मुंबई येथे वाहतूक विभागात सेवा केली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी सिंधूदूर्ग, रत्नागिरी, पुणे लोहमार्ग पोलिस दल येथे सेवा केली होती. पोलिस महासंचालक यांच्या सन्मानचिन्हाचे ते मानकरी होते.

SRPF Commandant Tushar Patil
SRPF Recruitment Case: दौंड SRPF पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर; युनिटचा 'कमांडंट'च निघाला 'मास्टरमाईंड'

समादेशक तुषार पाटील यांची काही वर्षापूर्वी मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मोठा परिवार आहे. जामनेर ( जि. जळगाव) येथे तुषार पाटील यांच्या मूळ गावी ८ जून रोजी सकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती गट क्रमांक पाचचे सहायक समादेशक सचिन डहाळे यांनी दिली.

पोलिस भरतीची फेरपरीक्षा

दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाच मधील सशस्त्र पोलिस शिपाई पदाच्या १०४ जागांसाठी भरती प्रक्रिया १६ मार्च २०२६ पासून सुरू करण्यात आली होती. १०४ जागांकरिता तब्बल २४४३६ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते. दरम्यान या भरतीच्या लेखी परीक्षेत `ए` संचात एका खासगी प्रकाशनाच्या प्रश्नसंचातील तब्बल ८५ प्रश्न आल्याने परिक्षेच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित करण्यात आली होती.

प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा झाल्यानंतर राज्य शासनाने १८ मे रोजी लेखी परीक्षा रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले. प्रश्नपत्रिका फुटीची चौकशी करण्यासाठी राज्याचे अपर पोलिस महासंचालक ( प्रशिक्षण व खास पथके ) यांनी राखीव पोलिस दलाच्या पुणे परिक्षेत्राचे प्रमुख तथा पोलिस उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांची नियुक्ती केली होती.

SRPF Commandant Tushar Patil
SRPF Exam Cancelled: NEETनंतर महाराष्ट्रात आणखी एक परीक्षा रद्द; SRPF भरतीतील 85 प्रश्न एकाच पुस्तकामधून

पोलिस महासंचालक यांना सादर करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात समादेशक तुषार पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान २४ मे रोजी स्वामी चिंचोली ( ता. दौंड) येथे या भरती प्रक्रियेची लेखी फेरपरीक्षा घेण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com