Abhijeet Patil-Vitthal Sugar Factory
Abhijeet Patil-Vitthal Sugar Factory Sarkarnama

Abhijeet Patil : अभिजीत पाटलांना महायुतीकडून ‘बूस्टर डोस’; ‘विठ्ठल’च्या 347 कोटींच्या कर्जाची घेतली थकहमी

Vitthal Sugar Factory Margin Loan : राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या मंजुरीनंतर विठ्ठल सहकारी कारखान्याला 347 कोटी रुपयांचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अभिजीत पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Published on

Solapur, 25 July : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना महायुती सरकारने मोठे पाठबळ दिले आहे. विठ्ठल सहकारी कारखान्याच्या 347 कोटी रुपयांच्या कर्जाची राज्य सरकारने थकहमी घेतली आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळ उपसमितीने या थकहमीच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य सहकारी बँकेचे (State Cooperative Bank) कर्ज थकल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिखर बँकेने (राज्य सहकारी बॅंक) विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर (Vitthal Sugar Factory) जप्तीची कारवाई केली होती. तसेच, कारखान्याची तीन गोदामे सील करण्यात आली होती, त्यामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिकदृष्टया अडचणीत सापडला होता. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.

भाजपसोबत गेल्यानंतर काही दिवसांनंतर राज्य सहकारी बॅंकेच्या कारवाईला स्थगिती मिळाली होती. अभिजीत पाटील यांनी भाजपसोबत जाऊन माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता.

Abhijeet Patil-Vitthal Sugar Factory
Bazar Samiti Election : आमदारकीअगोदर कार्यकर्त्यांना मिळणार सत्तेची संधी; सोलापूर, बार्शी बाजार समितीची अंतिम मतदारयादी जाहीर

त्या पाठिंब्याच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्परी मदत करण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार राष्ट्रीय सहकारी विकास निगम अर्थात ‘एनसीडीसी’कडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला 347 कोटी रुपयांची थकहमी अर्थात ‘मार्जिन लोन’ मंजूर करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने मंजुरी दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या मंजुरीनंतर विठ्ठल सहकारी कारखान्याला 347 कोटी रुपयांचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, त्या 347 कोटी रुपयांतून राज्य सहकारी बँकेचे थकीत कर्जाचे हप्तेही फेडले जाऊ शकतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अभिजीत पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Abhijeet Patil-Vitthal Sugar Factory
MLC Governor Quota : राज्यपाल नियुक्त आमदारकीची लॉटरी कोणाला...? परिचारक, काळे, पाटलांची ‘हायकमांड’कडे फिल्डिंग!

फडणवीसांनी शब्द पाळला

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला लागेल ती मदत करण्याचा शब्द दिला हेाता. फडणवीस यांनी तो शब्द पाळला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अभिजीत पाटील यांना महायुती सरकारकडून मोठे पाठबळ मिळाले आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही महायुतीकडून अभिजीत पाटील यांना संधी दिली जाते का हे पाहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com