दसरा मेळाव्याबाबत शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; केसरकर म्हणाले, मुंबईत अनेक मैदाने...

Deepak Kesarkar : छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी हायकोर्टाचे अनेक निर्बंध...

deepak kesarkar,eknath shinde, uddhav thackeray Latest News
deepak kesarkar,eknath shinde, uddhav thackeray Latest News sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसह शिवसेनेसोबत केलेल्या बंडामुळे शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे. यामुळे पक्ष चिन्हापासून ते शिवसेना कुणाची,असा प्रश्न सर्वोच्च न्यायालात गेला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा पंरपरागत होणारा दसरा मेळावा यंदा कुठे होणार याबाबतही चर्चा होत आहेत.

दरम्यान शिंदे यांनी भाजपसोबत युती करत राज्यात नवं सरकार स्थापन केल आहे. यामुळे मुख्यमंत्री म्हणून ते याबाबत काय भूमीका घेतात हे महत्वाचं ठरणार आहे. मात्र याबाबत शिंदे गटाकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र आज शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दसरा मेळाव्यासंदर्भात आपली भूमीका स्पष्ट केली आहे. (deepak kesarkar,eknath shinde, uddhav thackeray Latest News)


deepak kesarkar,eknath shinde, uddhav thackeray Latest News
'काही लोकांना आपण मुख्यमंत्रीच झाल्याचा भास' : सुजय विखेंचा निलेश लंकेंवर खोचक वार

केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदेसह आम्ही सर्व बाळासाहेबांची विचारधारा पुढे घेऊन चाललो असून दसरा मेळावा आणि बाळासाहेबांना वेगळं करता येत नाही. त्यांचे विचार आणि हिंदुत्वाच्या भूमिकेपासून आम्ही फारकत घेतलेली नाही. दसरा मेळावा ही बाळासाहेबांनी सुरु केलेली परंपरा याबाबत वाद निर्माण करण्याचा कुठलाही आमचा उद्देश नाही. मात्र जे बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेले त्यांनी काय करावं? कुणाची युती करावी किंवा करू नये हा विचार त्यांनीच करावा, असा टोला देखील केसरकरांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला.

बाळासाहेबांच्या विचारांचे आचरण करणे आमच्या सर्वांचे कर्तव्य आहे. दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहावी यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि आम्ही कटिबद्ध आहोत. हिंदुत्वापासून बाळासाहेब कधीच लांब गेले नसते आणि त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी कधीही केली नसती. हेच राज्यात घडलं. आणि यालाच बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जाणे म्हणतात. मात्र आम्ही हिंदुत्व आणि बाळासाहेब यांच्या विचारांशी दूर गेलो नाही, असे त्यांनी सांगितले.


deepak kesarkar,eknath shinde, uddhav thackeray Latest News
लाईट आली नसती तर तू वाचलाच नसतास..शंभूराज अधिकाऱ्यांवर कडाडले

दसरा मेळाव्याबाबत अद्याप कुठलीही चर्चा मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी झालेली नाही. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. मात्र त्याच ठिकाणी मेळावा घ्यावा असं नाही. दुसरीकडेही घेऊ शकतात. मात्र जेव्हा हा विषय असेल तेव्हा मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी हायकोर्टाचे अनेक निर्बंध असून त्याठिकाणी कुणाला परवानगी द्यावी याबाबत चर्चा होईल. याबाबत कुठलाही पक्षपाती निर्णय मुख्यमंत्री घेणार नाहीत. तसेच कुणाबाबत दुजाभाव होणार नाहीत. मुंबईत विविध मैदाने असून विचारधारा महत्त्वाची आहे, मैदान नाही, असाही टोला केसरकरांनी ठाकरे यांना लगावला आहे.


deepak kesarkar,eknath shinde, uddhav thackeray Latest News
Shiv sena : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार ; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावले

दरम्यान, शिवसेनेनं २२ ऑगस्टला मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला होता, परंतु शिवसेनेला अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळं शिंदे गटही दसरा मेळावा घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. याबाबत ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले की, "तात्रिंक-मांत्रिक बाबी काहीही असो मेळावा आम्ही शिवतीर्थीवर घेणार," "दसऱ्या मेळाव्याबाबत संभ्रम नसून,दसरा मेळावा होणारच," असे ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com