राजकीय वाद इतका टोकाला गेला की पोलिसांसमोरच सेना-भाजप कार्यकर्त्यांची मारामारी

दरेवाडीतील सरपंच-उपसरपंचांसह शिवसेना ( Shivsena ) व भाजपच्या ( BJP ) जिल्हा पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले.
मारामारी संग्रहित चित्र

मारामारी संग्रहित चित्र

सरकारनामा

नगर तालुका : दरेवाडी ( ता. नगर ) येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये राजकीय वादातून तुफान मारामारी झाली. त्यानंतर पोलिस ठाण्याच्या आवारातही दोन्ही गट समोरासमोर भिडल्याने, शिवराळ भाषेत शिवीगाळ करीत चांगलाच राडा घातला गेला. याप्रकरणी सरपंच-उपसरपंचांसह शिवसेना ( Shivsena ) व भाजपच्या ( BJP ) जिल्हा पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले. Storm fights in Darewadi: Crimes against Shiv Sena-BJP office bearers including Sarpanch and Deputy Sarpanch

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या भावजयी सरपंच, तर भाजपचेच अनिल करांडे उपसरपंच आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात राजकीय वाद सुरू आहे. एका गटाने शिवसेनेशी जवळीक साधली आहे. या वादाचे पर्यवसान सोमवारी राड्यात झाले. सकाळी वाकोडी फाट्यावर वाद झाल्यावर दोन्ही गट भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गेले. तेथेही दोन्ही गटांत पोलिसांसमोर चांगलीच वादावादी झाली.

मारामारी संग्रहित चित्र

खासदार विखे म्हणाले, कर्डिले होणार आमदार...

सरपंच स्वाती सुभाष बेरड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपसरपंच अनिल मल्हारी करांडे, वैभव मल्हारी करांडे, योगेश मच्छिंद्र बेरड, संतोष किसन करांडे, नवनाथ कराळे, रेखा अनिल करांडे, आशा काळे, अन्नपूर्णा संतोष करांडे (सर्व रा. दरेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपसरपंच अनिल करांडे व त्याच्या साथीदारांनी सोमवारी सकाळी वाकोडी फाटा येथे एका दुकानात, सरपंचपदाचे अधिकार मला का देत नाही, असा जाब विचारत शिवीगाळ करून मारहाण केली. इतर आरोपींनी दुकानातील साहित्याचे नुकसान केले. गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण व दुकानामधील गल्ल्यात असलेली रोकड जबरदस्तीने काढून नेली, अशा आशयाची ती फिर्याद आहे.

मारामारी संग्रहित चित्र

भाजपच्या या पदाच्या माध्यमातून अक्षय कर्डिले यांची राजकारणात एन्ट्री

दुसरी फिर्याद एका १९ वर्षीय तरुणीने दिली आहे. या फिर्यादीवरून वैभव संजय निंबाळकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास रतन बेरड, सुभाष रतन बेरड, सरपंच स्वाती सुभाष बेरड, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक आशा संजय निंबाळकर, मच्छिंद्र भानुदास बेरड, प्रताप गुलाब भोगाडे, नितीन संपत बेरड, विक्रम गुलाब भोगाडे (सर्व रा. दरेवाडी, ता. नगर), तसेच राजू भागवत कोरके, ज्योती सतीश काकडे, सतीश काकडे (रा. नागापूर, ता. नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मारामारी संग्रहित चित्र

`पी. एम. किसान`च्या घोळाबाबत भाजपच्या प्रा. बेरड यांनी केली भांडाफोड

आरोपी वैभव हा फिर्यादी युवतीची पाठलाग करून छेडछाड करीत होता. त्यास आरोपी मच्छिंद्र बेरड व सुभाष बेरड प्रोत्साहन देत होते. वाकोडी फाट्यावर सुभाष बेरड यांच्या दुकानात गेले असता तेथे आरोपींनी एकत्र येऊन फिर्यादी व साक्षीदारास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण केली. दोन महिलांना मारहाण करून त्यांच्या गळ्यांतील सोन्याचे गंठण ओढून नेले. मारहाण करणारा आरोपी विक्रम भोगाडे यास मच्छिंद्र बेरड व आशा निंबाळकर प्रोत्साहन देत होत्या, अशी ती फिर्याद आहे.

आगामी सोसायटी निवडणूक या वादाला कारण असल्याचे गावात दबक्या आवाजात बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com