Mahabaleshwar News : महाबळेश्वरातील अनधिकृत बांधकामांवर सक्त कारवाई करणार : जिल्हाधिकारी डुडी

Jitendra Dudi जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वर येथे हिरडा विश्रामगृहात बैठक झाली.
Satara Collector Jitendra Dudi
Satara Collector Jitendra Dudisarkarnama

Mahabaleshwar News : महाबळेश्वर तालुक्यात होणारी अनधिकृत बांधकामे, उत्खननांवर सक्त कारवाई करण्यात येईल, तसेच विनापरवाना वाणिज्य वापर होत असलेल्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तालुक्यात सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेऊनच बांधकामे व उत्खनन करावेत, तसेच यापुढे असे प्रकार होणार नाही, याची दक्षता स्थानिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या Satara collector अध्यक्षतेखाली महाबळेश्वर येथे हिरडा विश्रामगृहात बैठक झाली. यामध्ये अनधिकृत बांधकाम Unauthorized construction, विनापरवाना वाणिज्य वापर, तसेच बेकायदेशीर उत्खननावर आळा घालण्यासाठी महाबळेश्वर ग्रामस्तरावर संयुक्त समिती स्थापन केली. या समितीत तलाठी, ग्रामसेवक व नगरपालिका स्तरावर त्यांचे प्रतिनिधींची नियुक्ती केली.

महाबळेश्वर तालुक्यात १०० टक्के प्लॅस्टिक बंदी करण्यासाठी महसूल विभाग, नगरपालिका विभाग व वन विभाग यांनी संयुक्तरीत्या कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी केली. या वेळी शहरातील हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करताना प्लॅस्टिक बंदीबाबत सखोल चर्चा केली.

महाबळेश्वर शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठीही संबंधित विभागांना सूचना केल्या. शहरातील सर्व मोकळ्या जागांचा सर्व्हे करून त्या ठिकाणी पार्किंग सुविधा देण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

डॉ. साबणे रोड येथील सुशोभीकरणाबाबत नव्याने तयार केलेला पुनर्विकास आराखड्याचे सादरीकरण करून तेथील व्यापारी व नागरिकांशी बैठक घेऊन काम सुरू करण्यात यावे, असे सूचित केले. सद्यःस्थितीत विनापरवाना बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

महाबळेश्वर नगरपालिका व हिलदारो माध्यमातून सुरू असणाऱ्या उपक्रमाबाबत घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने केंद्र उभारण्यासाठीच्या सूचना नगरपालिका प्रशासनाला दिल्या.

Edited By Umesh Bambare

Satara Collector Jitendra Dudi
Satara News : जमावबंदी आदेशामुळे पोलिसांनी मूक मोर्चा रोखला; आंदोलकांवर केली कारवाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com