Subhash Deshmukh challenge to Patole : सुभाष देशमुखांचं नाना पटोलेंना आव्हान; ‘माझी इमारत बेकायदेशीर असेल तर तत्काळ पाडा’

भारतीय जनता पक्षाच्या नुकसानाची काळजी नाना पटोले यांनी करू नये. आमचं आम्ही बघून घेऊ.
Nana Patole-Subhash Deshmukh
Nana Patole-Subhash Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

Solapur Politic's : माझी इमारत बेकायदेशीर असेल, महापालिकेने मला परवानगी दिलेली नसेल, तसेच वापर परवाना नसेल तर तात्काळ पाडण अत्यंत गरजेचं आहे, अशा शब्दांत भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आव्हान दिलं. (Subhash Deshmukh's challenge to Nana Patole)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शुक्रवारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला भेट दिल्यानंतर अप्रत्यक्षपणे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुखांवर (Subhash Deshmukh) टीका केली होती. सुभाष देशमुखांचं घर अनधिकृत जागेत असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला होता. त्याला सुभाष देशमुखांनी आज उत्तर दिलं आहे.

Nana Patole-Subhash Deshmukh
Dilip Walse Patil News : ...तोपर्यंत माझ्या मनाला आनंद मिळणार नाही; वळसे पाटलांनी व्यक्त केली खंत

ते म्हणाले की, माझ्या घराची इमारत बेकायदेशीर असेल, महापालिकेने मला परवानगी दिलेली नसेल, तर ती तत्काळ पाडणं गरजेचं आहे. तसेच, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचा निर्णय हा न्यायालयाचा आहे. त्यावर माझ्यासारख्याने बोलणं उचित नाही, असे सांगून देशमुख यांनी चिमणीच्या प्रश्नावर बोलणं टाळलं.

Nana Patole-Subhash Deshmukh
Uddhav Thackeray News : मोदी, शहा हे महेबुबा मुफ्तींच्या शेजारी बसले नव्हते काय? : उद्धव ठाकरेंचा भाजपला खडा सवाल

दोन देशमुखांच्या वादात भाजपचं नुकसान होत आहे, असे विधान पटोले यांनी केले होते. त्यालाही देशमुख यांनी उत्तर दिले आहे, ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या नुकसानाची काळजी त्यांनी करू नये. आमचं आम्ही बघून घेऊ.

Nana Patole-Subhash Deshmukh
Solapur DCC Bank : माजी उपमुख्यमंत्री, तीन माजी मंत्री, १३ माजी आमदारांसह तीन विद्यमान आमदारांवर थकबाकीची जबाबदारी होणार निश्चित

काय म्हणाले होते नाना पटोले?

सोलापूरचे दोन्ही विद्यमान आमदार आणि माजी मंत्री देशमुखांचं एकमेकांबरोबर पटत नाही, त्यातील एका देशमुखांचं तर घरच अतिक्रमणात आहे. असं म्हणत त्यांनी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांवर अप्रत्यक्ष टीका केली होती. तसेच, काँग्रेसची सत्ता आल्यानंतर सरकारच्या पैशातून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला ही चिमणी बांधून देऊ, असा विश्वास त्यांनी कारखान्यातील कामगारांना दिला आहे.

Nana Patole-Subhash Deshmukh
Opposition Unity Meeting : पाटण्यातील विरोधकांच्या ऐकीच्या बैठकीने उद्धव ठाकरेंची केली कोंडी

दरम्यान, सध्याचे सोलापूरचे खासदार हे लिंगायत धर्माचे गुरुजी आहेत. गुरुजी आहेत; म्हणून लोकांनी मतं दिली आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या चांगल्या माणसाला पाडलं. पण, मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, असं म्हणत त्यांनी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यावर बोलणं टाळलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com