साखर आयुक्त गायकवाड म्हणाले, इरसाल माणसांमुळे पैस खांबाचे दर्शन घेऊन आलो!

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.
Ashok Sahakari Sakhar Karkhana
Ashok Sahakari Sakhar KarkhanaSarkarnama
Published on
Updated on

महेश माळवे

Shrirampur : आपल्या देशातली अडाणी म्हटली जाणारी माणसे इतकी इरसाल आहेत की, माझ्यासरख्या शिकलेल्या माणसाला कधी विकून टाकतील हे कळणारही नाही. त्यामुळेच मी 'अशोक'च्या गळीताला येताना ज्ञानेश्वरांच्या पैस खांबाचे दर्शन घेऊन आलो, अशी मिस्कील टिपणी राज्याचे साखर आयुक्त डॉ.शेखर गायकवाड यांनी करताच त्याला उपस्थित मान्यवरांसह सभासद शेतकऱ्यांनी दाद देत हास्याचे फवारे उडविले.

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आजवर नोकरीत आलेले अनुभव सांगत वातावरण आल्हादायक केले. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार भानुदास मुरकुटे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे, साखर सहसंचालक मंगेश तिटकारे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम आदी उपस्थित होते.

Ashok Sahakari Sakhar Karkhana
अशोक कारखाना निवडणुकीत सासरा विरुद्ध सून असा सामना रंगणार

गायकवाड म्हणाले, या देशाला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाले तेव्हाच साखरेबरोबरच १० माणसे अन्य देशात निर्यात केली असती तर बरं झालं असतं! त्या देशांची आत्तापर्यंत वाट लागली असती. त्यांनी ट्रम्प यांच्या रस्त्यात म्हसोबा उभा केला असता, तर मार्गारेट थेचर यांच्या शेतीला कुळ लावले असते. येथे बांध कसा कोरावा व तीन गुंठे जागा तिघांना विकून नऊ गुंठे कशी करता येते याचे प्रशिक्षण द्यावे लागत नाही.

नाशिक जिल्ह्यातील प्रसंग सांगताना ते म्हणाले, एका सरपंचाविरोधात खटला दाखल करताना माजी सरपंचाला पाच अपत्य होईपर्यंत वाट बघावी लागली होती. कारण त्याला तिसरे व चौथे अपत्याची माहितीच नव्हती. खटला दाखल झाल्यानंतरही या सरपंचाने सादर केलेले प्रतिज्ञापत्र मोठे गंमतीशीर होते. यामध्ये माझ्या नावाच्या उल्लेख करत स्वतःच्या पत्नीला झालेले तिसरे अपत्य आपले नसून, ते कोणाचे आहे याचा शोध घ्यावा, अशी विनंती करण्यात आली होती! हा अडाणी सरपंच, वकील व मलाही काय करायचे हे शिकवत होता. अशा प्रकारचे अनेक प्रतिज्ञापत्र मी माझ्या संग्रही ठेवले आहेत.

Ashok Sahakari Sakhar Karkhana
भानुदास मुरकुटे म्हणाले, विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही...

पुणे येथील यशदामध्ये एक जर्मन नागरिक आपल्याला भेटला. तो म्हणाला, तीन गुंठे असलेली जमीन नऊ गुंठ्यात रूपांतरित कशी करता येते हे आपल्याला शिकायचे आहे. त्यावर मी त्याला म्हणालो आम्ही लोक तुमच्या देशात येऊन ज्या पद्धतीने पदवी घेतो. त्यासाठी वीस लाख रुपये मोजतो. त्याच पद्धतीने जमीन कशी वाढवायची, बांध कसा कोरायचा यासाठी आमच्याकडे वीस लाख फी भरुन प्रवेश घ्यावा लागेल, असे सांगताच सभामंडपात चागलीच खसखस पिकली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com