सांगली : वाळवा तालुक्यात ऊस आंदोलनाची पुन्हा ठिणगी पडली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची हवा सोडण्यात आली, तर काही ट्रँक्टरची तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे. काल रात्री हा प्रकार घडला.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात ऊसदर आंदोलन (Sugarcane movement) पुन्हा पेटले आहे. बुधवारी रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) संतप्त कार्यकर्त्यांनी इस्लामपूर-बावची फाट्यादरम्यान राजारामबापू, हुतात्मा विश्वास साखर कारखान्याकडे निघालेल्या ३० ते ३५ ट्रॅक्टरची हवा सोडून तोडफोड केली. सांगली जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. तरीही कारखान्यांनी ऊस तोडी गतीने सुरू केल्या आहेत.
एकरकमी एफआरपीसाठी कारखान्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी गांधीगिरी मार्गाने शेतकऱ्यांना, वाहतूक दारांना गुलाब पुष्प देवून आंदोलन करण्यात आले होते. रात्री बावची फाटा ते इस्लामपूर दरम्यान राजारामबापू, हुतात्मा, विश्वास साखर कारखान्याकडे निघालेली वाहने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरली. यावेळी चाकातील हवा सोडून, वाहनांची तोडफोड केली. काही वाहनावर दगडफेक करण्यात आली. यामुळे वाहनधारकांनी ऊस वाहतूक करू नये, अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हेच एफआरपी कायद्याचे भक्षक ; राजू शेट्टींचा हल्लाबोल
सोमेश्वरनगर : ''राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) एफआरपी (FRP) कायद्याचे रक्षक बनण्याऐवजी भक्षक बनले असून एकरकमी एफआरपीमध्ये खलनायकासारखे आडवे येत आहेत,'' असा हल्लाबोल स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी (Swabhimani Shetkari Sanghatana Raju Shetty) यांनी केला. 'सरकारनामा'च्या विशेष मुलाखतीत राजू शेट्टी बोलत होते. याप्रसंगी शेट्टी यांनी आपल्या भूमिका स्पष्ट आणि सडतोड मांडल्या. ''२०११ साली एकरकमी एफआरपीचा कायदा करणाऱ्या पवारसाहेबांनीच कारखान्यावर व्याजाचा बोजा पडतो म्हणून एफआरपीचे तुकडे करण्यास सहमती द्यावी याचं आश्चर्य वाटतं. त्यावेळी बरोबर होते की आता हे त्यांनी सांगावे तसेच कारखानदारांचे नेते आहोत का शेतकऱ्यांचे हेही एकदा स्पष्ट करावे, असे आव्हान स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिले. तसेच राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील एफआरपी कायद्याचे रक्षक बनण्याऐवजी भक्षक बनले असून एकरकमी एफआरपीमध्ये खलनायकासारखे आडवे येत आहेत असा हल्लाबोलही त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.