Shirol Sugarcane Protest : कोल्हापुरातील शिरोळमध्ये ऊसाचं आंदोलन पेटलं, आमदाराच्या कारखान्याची ऊस वाहतूक करणारी वाहनं पेटवलं

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह आंदोलन अंकुश ने पुकारलेल्या ऊस दर आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना 10 नोव्हेंबरचा अल्टिमेटम दिला असताना शेतकऱ्यांनीच आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
farmers protest.jpg
farmers protest.jpgSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह आंदोलन अंकुश ने पुकारलेल्या ऊस दर आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti )यांनी साखर कारखानदारांना 10 नोव्हेंबरचा अल्टिमेटम दिला असताना शेतकऱ्यांनीच आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कारखान्याची ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर मंगळवारी (ता.28) संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पेटवून दिला. कालपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये संतप्त शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक करणारे वाहने अडवून रोखून धरली होती. तरी देखील आज वाहतूक सुरू असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ही वाहने पेटवून दिली आहेत.

पोलिस ठाण्याच्या आवारातच ठिय्या गतवर्षी तोडलेल्या उसाचा दुसरा हप्ता न देताच कारखाना सुरू केल्याबद्दल चिपरी (ता. शिरोळ) येथील यड्रावकर इंडस्ट्रीजवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ‘आंदोलन अंकुश’च्या पदाधिकाऱ्यांनी जयसिंगपूर पोलिस (Police) ठाण्याच्या आवारातच सोमवारी रात्रीपासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून उठणार नसल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

यंदा ऊस हंगामात उसाला विनाकपात प्रतिटन ऊसाला 3,751 रुपये इतकी एकरकमी एफआरपी द्यावा अशी मागणी राजू शेट्टींनी ऊस परिषदेत केली. त्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंतची डेडलाईनही दिली आहे.

farmers protest.jpg
Fadnavis Government : आमदारकीची पाचवी टर्म, तरीही फडणवीसांनी मंत्रिपदापासून लांब ठेवलं; वर्षापासून दाबून ठेवलेलं दुःख साईबाबांच्या भजनातून बाहेर

शक्तिपीठ महामार्ग कशाला पाहिजे, तेच पैसे कर्जमाफीसाठी वापरा. येत्या 28 तारखेला संत तुकडोजी महाराज यांच्या अमरावती येथील आश्रमातून नागपूरपर्यंत लाँगमार्च काढण्याची घोषणा केली.

सातबारा कोरा केल्याशिवाय मागे हटणार नाही. जर सातबारा कोरा केला नाही तर येणाऱ्या निवडणुकीत त्यांना तुडवा. आता मागे हटू नका, करेंगे या मरेंगे हेच धोरण ठेवा, अशी घोषणा राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे आयोजित 24 व्या ऊस परिषदेतून केला.

farmers protest.jpg
Phaltan Doctor death case : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; खासदाराचे कनेक्शन आले समोर

शेट्टी म्हणाले,सध्या सारखेचा दर सरासरी 3,750 रुपये आहे. गेल्या वर्षीच्या एफआरपीतील दोनशे रुपये यांनी द्यायलाच हवे. दिल्याशिवाय ह्यांच्या बापाला देखील सोडणार नाही. यंदा सारखेचा दर वाढणार आहे. आम्हाला दर मिळाला म्हणून तुम्ही आम्ही सुखवस्तू झालोत. आता आपल्याला लुटायला सुरू झाले. तुम्हाला आता ट्रॅक्टरमधून आंदोलनाला येऊ वाटत नाही.

शेतकरीच माझी ताकद आहे. पण तुम्हाला गांभीर्य नाही. अलीकडे शेतकऱ्यांची पोरं बिघडली आहेत. पण ज्या आंदोलनामुळे तुमच्या हातात स्मार्टफोन आला. त्याच स्मार्ट फोनने माझी मापं काढायला लागला. शेतकऱ्यांना मुली लग्नासाठी देत नाहीत. कारण यामागे अर्थकारण आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर सरकारला धोरण बदलण्यासाठी तुडवले पाहिजे, असं मत शेट्टी यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com