Vinod Tawde News: भाजप हायकमांडचे विनोद तावडेंना पाठबळ; फडणवीस समर्थकांमध्ये अस्वस्थता!

BJP News: यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही मुंबईत आल्यानंतर त्यांनी तावडेंच्या घरी भेट दिली होती.
Vinod Tawade-JP Nadda -Devendra Fadnavis
Vinod Tawade-JP Nadda -Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : केंद्रीय नेतृत्वाकडून गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पाठबळ दिले जात आहे. तावडे यांना हायकमांडचा मिळणारा पाठिंबा पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांमध्ये मात्र चलबिचल वाढत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या दौऱ्यात ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही मुंबईत आल्यानंतर त्यांनी तावडेंच्या घरी भेट दिली होती. (BJP high command supports Vinod Tawde; Disquiet among Fadnavis supporters!)

भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) हे दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नड्डा यांनी बुधवार संपूर्ण दिवस मुंबईसाठी दिला होता. त्या दौऱ्यात नड्डा यांच्याकडून फडणवीस यांच्यापेक्षा तावडे यांना महत्व देण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. विनोद तावडे (Vinod Tawade) आमदार असताना बांधण्यात आलेल्या अटल उद्यानाची पाहणीही केली. तसेच, तावडे यांच्या घरी भेट देण्याचा दौऱ्यात समावेश होता.

Vinod Tawade-JP Nadda -Devendra Fadnavis
Congress News : सिद्धरामय्यांनीच आम्हाला काँग्रेस सोडायला भाग पाडले : माजी मंत्री सुधाकर, सोमशेखर यांचा गौप्यस्फोट

राज्यात २०१४ च्या सरकारमध्ये विनोद तावडे हे शिक्षणमंत्री होते. मात्र, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांचे विधानसभेचे तिकिट कापण्यात आले होते. काही दिवसानंतर पक्षाने त्यांना राष्ट्रीय राजकारणाची जबाबदारी देत राष्ट्रीय सरचिटणीस बनविले होते. एकंदरीतच तावडे यांचा राज्याच्या राजकारणातून पत्ता कट करण्यात आला होता. मात्र, तावडे यांनी दिल्लीत जाताच हायकमांड मर्जी संपादन करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे दिल्ली दरबारी तावडे यांचे महत्व दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Vinod Tawade-JP Nadda -Devendra Fadnavis
Supreme Court : पुन्हा भिर्रर सुरु..; न्यायालयाच्या निकालावर खासदार कोल्हे म्हणाले..

दरम्यान, तावडे यांनी राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. चंदीगड महापालिकेत पुरसे संख्याबळ नसताना त्यांनी भाजपचा महापौर करून दाखवला होता.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत येताच तावडे यांच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवासांपासून राज्याच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनीही तावडे यांच्या कार्यकाळात झालेल्या अटल उद्यानाची पाहणी केली. त्याबाबतची माहिती त्यांनी तावडे यांच्याकडून घेतली. तसेच, तावडे यांच्या घरी भेट देण्याचाही दौऱ्यात समावेश आहे.

Vinod Tawade-JP Nadda -Devendra Fadnavis
NCP Satana News : भाजप खासदार, आमदारांच्या कुरघोडीमुळे मिळेना तहसीलदार!

दुसरीकडे, फडणवीस यांनी २०१९ मध्ये विनोद तावडे यांचे विधानसभेचे तिकिट कापले होते. पण, आता उत्तर मुंबई मतदारसंघातून तावडे यांना तिकिट देण्याची पक्षाकडून तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. पण, याच मतदारसंघातून प्रवीण दरेकर यांना तिकिट मिळावे, यासाठी फडणवीस आग्रही असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com