सुजय विखे, रावसाहेब दानवे, सुभाष देशमुखांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन : साधला वारकऱ्यांशी संवाद

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ), खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) व माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी आज पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले.
Subhash Deshmukh, Prashant Paricharak, Raosaheb Danve and Gahininath Maharaj with Dr Sujay Vikhe Patil
Subhash Deshmukh, Prashant Paricharak, Raosaheb Danve and Gahininath Maharaj with Dr Sujay Vikhe PatilParesh Kapse

पंढरपूर - आषाढी वारी निमित्त वारकरी पायी चालत थेट पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमले आहेत. विठ्ठलाच्या सावळ्या रुपाचे दर्शन घेण्याचा मोह राजकीय नेत्यांनाही आवरता आला नाही. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ), भाजपचे अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) व माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी आज पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त व वारकऱ्यांशी संवाद साधला. डॉ. सुजय विखे पाटलांना पाहून वारकऱ्यांनाही त्यांच्या बरोबर सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. Ashadi Ekadashi News Update

आषाढ महिना सुरू होण्या आधी पासूनच वारकऱ्यांनी दिंड्या, पालख्यांची तयारी सुरू केली होती. कोरोना संकटकाळामुळे दोन वर्षे वारी बंद होती. मात्र यंदा आषाढी वारी सुरू झाल्याने वारकऱ्यांत मोठा उत्साह आहे. नेहमी पेक्षा यंदा तरूण वारकऱ्यांची संख्या जास्त आहे.

Subhash Deshmukh, Prashant Paricharak, Raosaheb Danve and Gahininath Maharaj with Dr Sujay Vikhe Patil
केंद्रीय मंत्री दानवेंच्या हातावर कमळाची मेहंदी

टाळ, मृदुंग, विणा, तुळशी वृंदावण घेऊन निघालेले वारकरी आता पंढरपुरात दाखल झाले आहेत. उद्या (रविवारी) पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सपत्नीक विठ्ठल व रुक्मिणीची पूजा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज भाजपचे नेते रावसाहेब दानवे, सुजय विखे पाटील, सुभाष देशमुख, प्रशांत परिचारक यांनी पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यांचा सत्कार मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी केला.

आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे राज्यातून आलेल्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी विखे पाटील परिवाराने पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील वैष्णव सदन उभारले आहे. या सदनात सध्या मोठ्या प्रमाणात वारकरी थांबले आहेत. खासदार विखे पाटलांनी या वारकऱ्यांशी संवाद साधत व्यवस्थेची पाहणी केली. विखे व दानवे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. तसेच विखे यांनी वारकऱ्यांच्या समवेत जेवण केले. विठ्ठल मंदिरात विखे दर्शनासाठी गेले असता वारकऱ्यांना त्यांच्या समवेत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.

Subhash Deshmukh, Prashant Paricharak, Raosaheb Danve and Gahininath Maharaj with Dr Sujay Vikhe Patil
सुजय विखे म्हणाले आम्ही शिवसेनेसोबतच...पण...

हर्षवर्धन पाटलांशी सदिच्छा भेट

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी इंदापूर येथील दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघ येथे जाऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांची भेट घेतली. तसेच विविध विषयांवर चर्चा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com