जलपूजनावरून सुजित झावरेंची आजी-माजी आमदारांवर टीका

जलपूजनावरून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील ( Sujit Zaware Patil ) यांनी आजी- माजी आमदारांवर नाव न घेता निशाना साधला.
Sujit Zaware Patil
Sujit Zaware PatilSarkarnama

Parner : पारनेर तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. अनेक भागातील ओढे नाले वाहू लागले आहेत. बंधारेही भरून ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणचे तलाव आता भरू लागले आहेत. त्यामुळे तालुक्यातील नेते मंडळी तलाव भरल्यानंतर जलपूजनास हजेरी लावत आहेत. नुकतेच काही तलावा भरल्याने नेत्यांनी जलपुजनही सुरू केले आहे. त्या जलपूजनावरून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील ( Sujit Zaware Patil ) यांनी तालुक्यात मागील साडेसतरा वर्षांत जलसंधारणाचा एकही मोठा प्रकल्प झाला नसल्याचा आरोप करताना थेट आजी- माजी आमदारांवर नाव न घेता निशाना साधला.

Sujit Zaware Patil
डॉ. सुजय विखे पाटलांना वडिलांच्या मंत्रिपदामुळे पक्षाच्या राजकारणाला बळकटीची अपेक्षा...

पारनेर तालुक्यातील तिखोल येथील पाझर तलाव ओसंडून वाहू लागला आहे. त्याचे जलपूजन झावरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, तिखोलचा पाझर तलाव तालुक्यातील सर्वात मोठा पाझर तलाव आहे. या भागातील शेतकऱ्यांसाठी तो वरदान ठरला आहे. या पाझर तलावामुळे या परिसरातील सुमारे एक हजार एकर क्षेत्र ओलीताखाली आले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. सध्या अनेक भागातील पाझर तलाव भरत आहेत त्यामुळे तालुक्यातील नेत्यांची जलपूजनाची स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र गेली साडेसतरा वर्षात एकही मोठा पाझर तलाव झाला नाही. त्यामुळे जलपूजन करणारांनी प्रथम पाझर तलाव बांधायला हवे होते असे प्रतिपादन करून आजी व माजी आमदार त्यांचे नाव न घेता विनाकारण श्रेय लाटू नका, अशी टीका केली आहे.

Sujit Zaware Patil
`तहसीलदार देवरे, सुजित झावरे आणि माळी यांचा हा कट`

ते पुढे म्हणाले, या पुढेही जलपूजनाचे कार्यक्रम होतीलही मात्र तालुक्यात मांडओहोळसारखे मोठे तलाव (स्व.) शंकरराव काळे, (स्व.) वसंतराव झावरे पाटील, गोविंदराव आदिक, आबासाहेब निंबाळकर यांच्या काळात झाले आहेत. वसंतराव झावरे यांच्या काळात काळू सारखा मोठा पाझर तलाव झाला. जलपूजनाची हौस असणारांनी साडेसतरा वर्षांत एकही मोठा पाझर तलाव केला नाही अधी त्यांनी मोठे पाझर तलाव बांधावेत व मग जलपूजन करावे अशी टीका केली .

सुजीत झावरे नेहमीच तालुक्यात विविध विकासकामात सक्रीय असतात. या पूर्वी ते विकासकामांच्या उदघाटन प्रसंगी म्हणत सत्ता नसतानाही मी एवढा मोठा निधी आला आहे. आता तर ते म्हणतात आमची सत्ता आहे. त्यामुळे विकासकामांना निधीची कमतरता भासणार नाही. झावरे सध्या राज्यात सत्ता असलेल्या पक्षात असल्याने व राजकारणाची असलेली पार्श्वभूमी विचारात घेता झावरे यांना आजी व माजी आमदारांचे प्रतिस्पर्धी समजले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com