डॉ. सुजय विखे पाटलांना वडिलांच्या मंत्रिपदामुळे पक्षाच्या राजकारणाला बळकटीची अपेक्षा...

हिंमत असेल तर आमच्यासारखे निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी विरोधकांना दिले.
Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Dr. Sujay Vikhe Patil : आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना पहिल्या क्रमांकाने शपथविधी आणि महसूलमंत्रिपद देऊन भाजपने विरोधकांना चपराक दिली. भाजपमध्ये जाण्याचा माझा निर्णय योग्यच होता, हे सिद्ध झाले. सत्ता तिकडे विखे पाटील, अशी टीका करणाऱ्यांनी हिंमत असेल तर आमच्या सारखे निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी जिल्ह्यातील त्यांच्या विरोधकांना दिले. तसेच जिल्हात भाजपचे आमदार निवडून आणायचे आहेत, असे सूचक विधान करीत जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे संकेत देखील दिले.

लोणी येथील मंत्री विखे पाटील यांच्या सत्कार सभेतील त्यांच्या या भाषणातून मंत्री विखे पाटील राज्याचे आणि आपण शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकारण पाहू, असे विधान त्यांनी केले. सध्याचा नवा भाजप हा संघटनात्मक बांधणीला महत्त्व देत इलेक्टिव्ह मेरीट असलेल्यांना बरोबर घेऊन विस्तारणारा पक्ष आहे. विखे पाटील परिवाराची जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघांत काही प्रमाणात राजकीय ताकद आहे. त्याआधारे भाजपमधील जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी या निमित्ताने खासदार डॉ. विखे पाटील यांना मिळू शकेल. त्यादृष्टीने देखील विखे पाटील यांना मिळालेल्या महसूलमंत्रिपदाला एक वेगळे महत्त्व आहे.

Dr. Sujay Vikhe Patil
वाळू आणि बदल्यांच्या पैशात अडकलेल्यांचा भविष्यात हिशेब होणार - सुजय विखे

राज्यात शुगर लॉबीतील जे नेते स्वबळावर निवडून येतात, त्यात विखे पाटील यांचा समावेश आहे. त्यांची निवडून येण्याची, जिल्ह्यातील काही मतदारसंघांत निवडून आणण्याची आणि वेळप्रसंगी पाडण्याची क्षमता लक्षात घेऊन त्यांच्यासाठी अपवाद वगळता जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी वेळोवेळी आपले दरवाजे खुले केले. जिकडे सत्ता तिकडे विखे पाटील, या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना हिंमत असेल तर तुम्ही आमच्या सारखे निवडून येऊन दाखवा, असे आव्हान डॉ. विखे पाटील यांनी त्यामुळेच त्यांच्या विरोधकांना लोणीतल्या सभेत दिले.

Dr. Sujay Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील सातव्यांदा शपथबद्ध : ६ मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याचा अनुभव गाठीशी

आपल्याला जिल्ह्यातील आमदार देखील निवडून आणायचे आहेत, असे विधान डॉ. विखे पाटील यांनी बोलण्याच्या ओघात केले, तर मंत्री विखे पाटील यांनी पक्ष संघटनेतील पदाधिकारी आणि आपल्यात दुरावा निर्माण होणार नाही, अशी ग्वाही दिली. याचा अर्थ असा की येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे संख्याबळ वाढविण्यासाठी प्रयत्न करायचे त्याचवेळी पक्षाच्या संघटनात्मक ढाच्यासोबत राहून काम करायचे त्यांनी ठरविलेले दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com