Sunil Tatkare On NCP Crisis : राष्ट्रवादीमुळे 2014 ला भाजपचं सरकार, तटकरेंनी टाकला बॉम्ब; म्हणाले, 'साहेबांनीच...'

Sunil Tatkare On Sharad Pawar : ते मी नाही केलं, साहेबांनीच केलं...
Sunil Tatkare On NCP Crisis :
Sunil Tatkare On NCP Crisis :Sarkarnama
Published on
Updated on

Karjat News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) शिबिर आज कर्जत येथे पार पडत आहे. यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. यापुढील पक्षाची दिशा, वाटचाल आणि निवडणुकांची तयारी कशाप्रकारे करायची, याबाबत वरिष्ठ नेत्य़ांनी मार्गदर्शन केले. या वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना काही गौप्यस्फोट केले आहेत. (Latest Marathi News)

Sunil Tatkare On NCP Crisis :
Ajit Pawar: मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांचे पुन्हा मोठे संकेत; म्हणाले, 'आधी लोकसभेची निवडणूक, नंतर...'

तटकरे म्हणाले, "मागील 2014 मधील विधानसभेचे निकाल जाहीर होण्याआधीच आम्ही सर्व पक्षाचे नेते एकत्रित बसलो होतो. निकाल पूर्ण हाती येण्याआधीच सूचना आली, की भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा देण्याचं घोषित करा. दुपारी एक वाजता सूचना आली आणि पूर्ण निकाल चार वाजता जाहीर झाले होते. आम्ही त्यावेळेला जाहीर करून टाकलं, की भाजपला पाठिंबा द्यायचा आहे. भाजपने पाठिंबा मागितला नव्हता, पण आम्ही तो दिला. यामुळे भाजपचं सरकार त्यावेळी महाराष्ट्रात आलं," असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला.

तटकरे म्हणाले, "माझ्यावरती तेव्हा आरोप केला जात होता की, भाजपसोबत युती करण्यासाठी, मी त्यावेळेला अलिबागला बैठक बोलावली. ती बैठक मी नव्हती बोलावली, केंद्रीय नेतृत्वाने (शरद पवार) मला बैठक बोलवायला सांगितलं होतं. आमदार आणि पराभूत उमेदवारांचे अलिबागला एक शिबिर घ्यावं असं ठरलं. आताचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हॉटेलवरती ते शिबिर झालं. आणि त्या वेळेला ही चर्चा झाली होती."

Sunil Tatkare On NCP Crisis :
Jayant Patil News : महायुती सरकारविरोधात शरद पवार गट मैदानात उतरणार; जयंत पाटलांची मोठी घोषणा

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजितदादांमुळेच पक्ष उभा राहिला -

अजितदादांमुळेच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला आहे. पक्षासाठी दिलेलं अजितदादांनी योगदान कुणीही विसरू शकत नाही. 2019 मध्ये आपण सरकारमध्ये आलो, पण तेव्हा युतीला स्पष्टपणे जनतेचा कौल मिळाला होता. महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यावेळी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला हेसुद्धा अघटित आहे. यामुळे उद्धव ठाकरेंचं सरकार आलं, असेही तटकरे म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com