Sunil Tatkare : भुजबळांच्या नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत तटकरेंचे मोठे भाष्य; म्हणाले ‘भुजबळांचा मंत्रिमंडळातील समावेश...’

Chhagan Bhujbal Guardian Ministership : तुम्ही सरकारमध्ये असाल तर बहुजन समाजाचे हित साधले जाईल, असा विचार पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मांडले होते. त्यानुसार आम्ही काम करत आहोत, त्याविचारानुसार आम्ही एनडीएसोबत गेलो आहोत.
Chhagan Bhujbal-Sunil Tatkare
Chhagan Bhujbal-Sunil Tatkare Sarkarnama
Published on
Updated on

Karad, 22 May : ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबतची चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिमंडळातील सर्वांत ज्येष्ठ सदस्य असलेल्या भुजबळ यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्रिपद सोपविले जाईल, अशी चर्चा रंगली आहे. मात्र त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी मोठे भाष्य केले आहे, त्यामुळे नाशिकचे पालकमंत्रिपद कोणाकडे जाईल, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता आज (ता. २२ मे) ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या कऱ्हाड येथील समाधीस्थळी अभिवादन करुन करण्यात आली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत भाष्य केले.

तटकरे म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा झालेला समावेश आणि नाशिकचे पालकमंत्रिपद याचा कोणताही परस्पर संबध नाही. या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आलेली आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरात लवकर व्हावा, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची इच्छा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे तिघे त्यावर निर्णय घेतील,

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत तीनही पक्षाचे प्रमुख हे महायुती म्हणून कटुता न वाढवता एकत्रितपणे कसे लढता येईल, याचा निर्णय घेतील. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, नगरपालिकेत आणि महापलिकेत वेगवेगळी परिस्थिती असते. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन कशा निवडणुका लढवता येईल, हे पाहिले जाईल, असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

Chhagan Bhujbal-Sunil Tatkare
Vaishnavi Hagavne Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचे मोठे विधान; ‘त्या दोघांना कुठल्याही बिळात लपू द्या.....’

खासदार तटकरे म्हणाले, तुम्ही सरकारमध्ये असाल तर बहुजन समाजाचे हित साधले जाईल, असा विचार पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मांडले होते. त्यानुसार आम्ही काम करत आहोत, त्याविचारानुसार आम्ही एनडीएसोबत गेलो आहोत. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांपासून आम्ही थोडेही बाजूला गेलो नाहीत. आम्ही आमच्या विचारांवर आणि भूमिकेवर ठाम आहोत.

Chhagan Bhujbal-Sunil Tatkare
Dhule Cash Controversy : विजय वडेट्टीवार म्हणतात, ‘आमदारांची बदनामी होतेय; अधिकाऱ्यांनी पैसे गोळा केलेत’

राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणून आम्ही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहोत, त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा स्वतंत्रपणे लढवणे, हा विचारही कधी आमच्या मनात येऊ शकत नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com