Satara Maratha Morcha News : जरांगेंच्या उपोषणास पाठिंबा; साताऱ्यात बाइक रॅली

CM Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यात आरक्षणाचा विषय ऐरणीवर असून, मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे
SataraBike Rally
SataraBike RallyPramod Ingale, Satara
Published on
Updated on

Satara Maratha Reservation News : मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या सुकाणू समितीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सातारा शहरात साखळी उपोषण सुरू केले आहे. आरक्षणाविषयी जनजागृती व्हावी, याकरिता सुमारे पाचशे मराठा बांधवांनी सातारा शहरातून बाइक रॅली काढली. आरक्षण देणार नसाल तर निवडणुकांमध्ये याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण Maratha Reservation मिळावे, याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यभर साखळी उपोषणे नेत्यांना गावबंदी तसेच प्रबोधन प्रचार इत्यादी कार्यक्रम सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या सातारा जिल्ह्यातही आरक्षणाचा विषय ऐरणीवर असून, साताऱ्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या Satara Maratha Kranti Morcha पदाधिकाऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर साखळी उपोषणाचे सत्र सुरू झाले आहे . गुरुवारी सकाळी पहिल्या सत्रात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुमारे 500 आंदोलकांनी सातारा शहरातून बाइक रॅली काढली. यामध्ये महिलासुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या.

आंदोलनाचे संवेदनशील स्वरूप लक्षात घेता, जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही बाइक रॅली शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू झाली. मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी बाइक रॅलीने पोवई नाका, शाहू चौक, राजपथावरून राजवाडा, गोल बागेला वळसा घालून कर्मवीर पथावरून पोलिस मुख्यालय मार्गे पुन्हा पोवई नाका व तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर आली. Maharashtra Political News

SataraBike Rally
Satara NCP News : अजित पवारांचे निष्ठावंत अमित कदमांवर दिली महत्त्वपूर्ण जबाबदारी...

आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा... अशी जोरदार घोषणाबाजी या वेळी करण्यात आली. या रॅलीने संपूर्ण सातारा शहरातील लक्ष वेधून घेतले.मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पदाधिकारी संदीप पोळ, संग्राम बर्गे, शरद काटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आंदोलनात या मोर्चात सहभागी झाले होते.

मराठा आरक्षण हा विषय अत्यंत संवेदनशील असून, याचा राजकारणासाठी वापर होऊ नये; पण सध्याच्या सरकारकडून निवडणुकीतील एक संवेदनशील मुद्दा इतक्याच कारणास्तव त्याचा वापर केला जात आहे. आरक्षणाचे घोंगडे फार काळ भिजत ठेवू नका. येत्या चार दिवसांत आरक्षणासंदर्भात आम्हाला योग्य ती कार्यवाही दिसावी; अन्यथा आरक्षण न दिल्यास याची निवडणुकीत जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा समन्वयकांनी दिला आहे.

Edited By : Umesh Bambare

SataraBike Rally
Satara News : बीडीओ सतीश बुद्धे यांच्या 'त्या' फलकाची चर्चा; काय आहे जाणून घ्या...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com