संभाजीराजेंबाबत जो खेळ लावण्यात आलाय, तो थांबवा; अन्यथा... : मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजेंना पाठिंबा द्या; अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा : मराठा क्रांती मोर्चा
Sambhaji Raje
Sambhaji Rajesarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : राज्यसभा उमेदवारीच्या (Rajya Sabha) पाठिंब्यावरून संभाजीराजेंबाबत (Sambhaji Raje) जो राजकीय खेळ लावण्यात आलेला आहे, तो लवकरात लवकर थांबवा, अशी माझी सर्वच राजकीय पक्षांना विनंती आहे. या निवडणुकीत संभाजीराजेंना पाठिंबा द्यावा; अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा धमकी वजा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) राज्य समन्वयक धनंजय साखळकर यांनी दिला आहे. (Support Sambhaji Raje in Rajya Sabha elections: Maratha Kranti Morcha)

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाराष्ट्रात राजकीय घमासान सुरू झाले आहे. शिवसेनेने सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. मात्र, त्यांच्यासमोर काही अटी ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संभाजीराजेंनी शिवसेनेचा प्रस्ताव नाकारल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात बोलताना मराठा क्रांती ठोक मोर्चाचे साखळकर यांनी वरील इशारा दिला आहे.

Sambhaji Raje
राजगड कारखाना दलबदलू नेत्यांच्या पुनर्वसनाचा अड्डा नव्हे : भाजप पदाधिकाऱ्याने डागली तोफ!

साखळकर म्हणाले की, राज्यसभेच्या खासदारकीसाठी शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावाला लाथ मारली, याबद्दल मी संभाजीराजे छत्रपती यांचे अभिनंदन करतो. संभाजीराजेंबाबत जो राजकीय खेळ लावण्यात आलेला आहे, तो लवकरावत लवकर थांबवावा, अशी माझी सर्वच राजकीय पक्षांना विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळी जर आतासारख्या अटी ठेवल्या असत्या, तर आज आपण सत्तेवर बसला नसता अथवा सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोचू शकला नसता.

Sambhaji Raje
महाआघाडी आणि अमोल कोल्हेंमुळे बैलगाडा शर्यती सुरू झाल्या : सुप्रिया सुळे

राज्यसभेच्या निवडणुकीत संभाजीराजेंना प्रथम क्रमांकाची मते दिली नाहीत, तर त्याचे परिणाम भविष्यात सर्वच राजकीय पक्षांना भोगावे लागतील. त्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयार राहावे. संभाजीराजे यांच्या भूमिकेला आणि त्यांच्या अपक्ष खासदारकीस पाठिंबा द्यावा, अशी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सर्वच राजकीय पक्षांना विनंती करतो; अन्यथा आगामी काळात होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे, असा इशाराही मराठा क्रांती ठोक मोर्चाचे धनंजय साखळकर यांनी दिला आहे.

Sambhaji Raje
ही दोस्ती तुटायची नाय...कट्टर विरोधक माने-जाधव १६ वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर!

दरम्यान, संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर धुडकावून लावल्यानंतर राज्यात राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले आहे. त्यात मराठा क्रांती मोर्चाच्या या धमकी वजा इशाऱ्यानेही मोठी खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com