Satara Supriya Sule News : 'ज्येष्ठ नेते शरद पवार हे ६० वर्षे राजकारणात आहेत. त्यांनी चार वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रात ते मंत्री होते. काल मी आणि पवार साहेब पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गेलो. नेहमीप्रमाणे बैठकीसाठी काल वेळेअगोदर पवार साहेब व मी येवून बसलो होतो.'
तर 'पालकमंत्री बैठकीसाठी आल्यानंतर जेष्ठ नेते पवार हे पालकमंत्र्यांचा प्रोटोकॉल म्हणून स्वतः उठुन उभे राहिले. त्यांनी पालकमंत्र्यांच्या प्रोटोकॉल पाळला मात्र पालकमंत्र्यानी तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार नाही, असे सांगितल्यावर त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही.' अशी स्पष्टोक्ती खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजीत महिला मेळाव्यासाठी खासदार सुळे(Supriya Sule) रविवारी कराड (जि.सातारा) दौऱ्यावर होत्या. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, महिला विभागाच्या संगीता साळुंखे, प्रभाकर देशमुख, देवराज पाटील व मान्यवर उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या, 'खासदार शरद पवार(Sharad Pawar) यांनी नियोजन समीतीच्या बैठकीत तालुकानिहाय विकास कामांचा आढावा देण्याची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी माहिती सध्या नाही ती घेवून देतो असे सांगितले. त्यामुळे त्यावर तो विषय संपला होता.'
मात्र 'पुण्याच्या पालकमंत्र्यांनी आम्हाला अध्यादेश दाखवून त्यात आमदार, खासदार हे आमंत्रीत असुन त्यांना प्रश्न विचारायचा अधिकारी नाही असे सांगीतले. तुम्हाला आम्ही पुढे बसवतो मात्र मागचे पुढे बसायला पाहिजेत, असे ते म्हणाले. तसा प्रोटोकॉल असेल तर तो अनेक वर्षे का पाळला गेला नाही? आम्ही मागेच काय कुठेही बसलो असतो.' असंही सुळेंनी सांगितलं.
तसेच 'अध्यादेशात बैठकीला आमंत्रीत असलो तर संविधानाप्रमाणे प्रत्येकाला बोलायचा अधिकारी आहे, त्या बैठकीला आम्ही मतदान करु शकत नाही. आम्ही मतदान मागत नव्हतो, तर प्रश्न विचारत होतो. जेष्ठ नेते पवार यांनी विकास निधी कसा वाटला जातो असे विचारले. त्यावर पालकमंत्र्यांनी मोठे व्याख्यान दिले. त्यानंतर मी तो अध्यादेश वाचुन आम्हाला बोलायचा अधिकारी नाही तर बैठकीला बोलवता कशाला असे प्रशासनाला विचारले. त्यावर प्रशासनाने आम्हाला बोलायचा अधिकार आहे असे सांगीतले.' असं सुळे म्हणाल्या.
याशिवाय 'मग ही पालकमंत्र्यांची दडपशाहीच आहे. त्या दडपशाहीविरोधात मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन आमदार, खासदारांचे काय नियम, कायदे आहे हे विचारणार आहे. पालकमंत्र्यांनी ज्यावेळी तुम्हाला बोलण्याचा अधिकारी नाही असे सांगितल्यावर पवार साहेबांनी एकही प्रश्न विचारला नाही. बैठकीसाठी काल वेळेअगोदर ते येवून बसले होते.'
'पालकमंत्री बैठकीसाठी आल्यानंतर जेष्ठ नेते पवार हे पालकमंत्र्यांच्या प्रोटोकॉल म्हणुन स्वतः उठुन उभे राहिले. मी मात्र प्रश्न विचारले, मी नाही थांबले. एवढ्या नियम कायद्याने सरकार चालत असेल सगळ्याच बाबतीत नियम कायदे करावे. व्यासपीठावर जो कोणी बसेल त्याचा प्रत्येकाचा प्रोटोकॉल पाळला पाहीजे. ही दडपशाहीची सुरुवात आहे. त्याविरोधात आम्ही नेहमीच लढू.' असही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्रात सध्या गुन्हे वाढले आहे असे सांगुन खासदार सुळे म्हणाल्या, 'जेव्हा-जेव्हा भाजप(BJP) सरकार सत्तेवर येते त्यावेळी गुन्हे वाढतात हा केंद्र सरकारचा डेटा सांगतो. पहिल्या पाच वर्षांपुर्वी नागपुरला क्राईम जास्त असायचा. आज ते बदलले असुन पुणे हे आज राज्याचे क्राईम कॅपीटल झाले आहे. हे सांगताना मला वेदना होत आहेत.'
तसेच 'मला महाराष्ट्र पोलिसचा सार्थ अभिमान आहे. देशात चांगले पोलिस महाराष्ट्रात आहेत. मात्र मंत्री, सरकार गंभीर नसल्याने अशा गोष्टी होत आहेत. अनेक समाज आंदोलन करतात, त्यावेळी लाठीहल्ला केला जातो ते आदेश कोणी दिले याचे आजही महाराष्ट्र सरकारला उत्तर मागतोय. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणे, भडखाऊ भाषणे करणे, दोन समाजात अंतर वाढेल अशी भाषणे सरकारकडूनच येत आहेत. घरफोडा, पक्षफोडा, चिन्ह काढुन घ्या हेच काम सध्या सुरु आहे. सरकारने सामान्यांसाठी काहीच केले नाही. या सरकारमधील भ्रष्टाचारावर तर काय बोलणार?' अशा शब्दांमध्ये सुप्रिया सुळे यांनी टीका केली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.