Supriya Sule : आमच्याकडे खरे वाघ, दिल्लीला मुजरा करणारे नाहीत...; नाव न घेता सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोला

Supriya Sule On Agriculture scam Maharashtra : "देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला शब्द दिला होता की, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू, कोण काय बोललं मला माहिती नाही. पण मुख्यमंत्री यांनी दिलेलं आश्वासन पाळलं पाहिजे. सर्वात धक्कादायक म्हणजे, राज्यातील कृषीमंत्यांनी मान्य केलं की हार्वेस्टिंगचा घोटाळा झाला.."
Supriya Sule Vs Ajit Pawar
Supriya Sule Vs Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 24 Jan : "भाजपने आमचा पक्ष फोडला अशी कोणतीही माहिती नाही किंवा आमच्या खासदारांना भाजपने कोणताही संपर्क केलेला नाही. आमच्याकडे आहेत ते खरे वाघ आहेत. दिल्लीपुढे मुजरा करणारे नाहीत"; अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला.

राज्यात पालकमंत्रिपदावरून इतकी चर्चा होतेय की इतकं बहुमत असताना या चर्चा कशाला करता. घटनात्मक पद नसताना यात उप असे बदल केले जात आहेत. आतापर्यंत कामाला लागून कोल्हापुरात (Kolhapur) सोन्याचे रस्ते झाले पाहिजेत, सोन्याचा नाही तरी चांदीचा तरी रस्ता करा, अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित महाराणी ताराबाई यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी होणार आहे. त्यासाठी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आज कोल्हापुरात आल्या आहेत, यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, लाडक्या बहिणींना सरकारने तातडीने 2100 रुपये दिले पाहिजेत. सरकार येऊन 60 दिवस झाले.

Supriya Sule Vs Ajit Pawar
Tanaji Sawnat : तानाजी सावंतांची नाराजी कायम; सेनेच्या मेळाव्याला दांडी, मतदारसंघाकडे फिरवली पाठ!

मात्र वन मॅन शो काम होत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकटेच काम करत आहेत. बाकीचे कोण कुठं फिरत आहे, परदेशात फिरतं मला माहिती नाही. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला शब्द दिला होता की, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू, कोण काय बोललं मला माहिती नाही. पण मुख्यमंत्री यांनी दिलेलं आश्वासन पाळलं पाहिजे. सर्वात धक्कादायक म्हणजे, राज्यातील कृषीमंत्र्यांनी मान्य केलं की हार्वेस्टिंगचा घोटाळा झाला.

याबाबतची सगळी माहिती आम्ही केंद्राच्या समोर ठेवणार आहे. पेनड्राईव्ह लोकसभेत देणार आहे. केंद्राला न विचारता केलेला फेरफार का केला? हे समजलं पाहिजे. शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. जवळपास हा पाच हजार कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती आहे. केंद्र सरकारच्या नियम व कायद्यात बदल करून हा घोटाळा झाला असून याची माहिती राज्याच्या कृषीमंत्र्यांनीच दिली.

Supriya Sule Vs Ajit Pawar
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितली बैलगाडीत झोपलेल्या जिल्हाधिकाऱ्याची गोष्ट

यासाठी त्यांचे जाहीर आभार, त्यांनी भ्रष्टाचार बाहेर आणला, आम्ही त्यांच्या मागे ठाम राहू, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. शक्तिपीठ महामार्गवरून बोलताना, या जिल्ह्यात आमचे लोकप्रतिनिधी निवडून आले नसले तरी नैतिकता ही महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये. आम्ही निवडणुका लोकांना फसवण्यासाठी लढवत नाही. आम्हाला अपयश आले असेल तरी आम्ही नैतिकता सोडली नाही.

असा टोला त्यांनी महायुतीच्या कोल्हापुरातील नेत्यांना लगावला. पूर्वी शिवसेना आणि भाजप एकत्र असताना ते स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्वबळावर लढत होते. आमच्यात कुणी स्वबळाची भाषा केली की महाविकास आघाडी फुटली असं भासवलं जातं. पण असं काही नाही. आम्ही एकत्र आहोत याबाबत आम्ही एकत्र बसून ठरवू, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com