सुप्रिया सुळे म्हणाल्या, युक्रेनमधून मुलं आणली म्हणजे उपकार केले नाहीत...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी एका कार्यक्रमातील भाषणातून खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांच्या टीकेला चोख प्रतिउत्तर दिले.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी केंद्र सरकारने मोफत आणले, राज्य सरकारने महाराष्ट्रतील विद्यार्थ्यांच्या एका तरी विमानाचा खर्च उचलावा अशी टीका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी एका कार्यक्रमातील भाषणातून खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांच्या टीकेला चोख प्रतिउत्तर दिले. ( Supriya Sule said that bringing children from Ukraine did not mean doing favors... )

जागतिक महिला दिनानिमित्त आज (सोमवारी) अहमदनगर येथे महिला शेतकरी कंपनीच्या ‘पृथाशक्ती’ फेडरेशनतर्फे महिला मेळावा घेण्यात आला. या प्रसंगी त्या बोलत होत्या. या मेळाव्याला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, आमदार संग्राम जगताप, शिवप्रहारचे नेते संजीव भोर, नाफेडचे संचालक राजबीरसिंग, मार्केटींग फेडरेशनचे संचालक कार्यकारी संचालक सुधाकर तेंलंग यांच्यासह फेडरेशनच्या अध्यक्ष डॉ. भाग्यश्री टिळेकर उपस्थित होते.

Supriya Sule
Video : मी आदरणीय अमित शहांकडे न्याय मागणार आहे : सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लाल दिवे काही फक्त मिरवण्यासाठी, फिरवण्यासाठी नसतात, सरकारने समाजासाठी काम करायचं असते. सरकारची ती जबाबदारी आहे. राज्यात आघडी सरकार काम करत आहे असे सांगतानाच केंद्र सरकारवर निशाना साधला. युद्धाच्या परिस्थितीत युक्रेनवरुन मुलांना आणले म्हणजे उपकार केले नाहीत. सरकारचे ते कामच आहे, कर्तव्य आहे. लोकांसाठी काम करत असल्याने आम्ही राजकारणात यशस्वी आहोत.’’

Supriya Sule
Video: मालिकांना कुठलीही ईडीची नोटीस पाठवली नव्हती, सुप्रिया सुळे

खासदार सुळे पुढे म्हणाल्या की, राज्यातील महिलांनी शेतकरी उत्पादन कंपन्या केल्या. पृथाशक्ती महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे फेडरेशन झाले. शेतमाल खरेदी-विक्रीतून महिला कोट्यावधीची उलाढाल करतात ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आता केवळ उत्पादन नाही तर मार्केटींग महत्वाचे असून त्यासाठी महिलांनी विश्वासर्हता मिळवणे गरजेचे आहे. महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या शेतमाल विक्रीसाठी नाशिकला प्रायोगिक तत्वावर ‘मॉल’ उभारण्यासाठी आणि पुढील पाच वर्षांत हा प्रयोग राज्यात राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Supriya Sule
सुप्रिया सुळे पुन्हा 'संसदरत्न' : सलग ७ व्या वर्षी मिळाला मानाचा पुरस्कार

‘‘महिला दिन ही संकल्पनाच मला मान्य नाही. वर्षभरातील 365 दिवस माणुसकीचे असले तर आम्हाला महिला किंवा पुरुष दिन साजरा करण्याची गरज पडणार नाही. महिलांच्या शेतकरी कंपन्या झाल्या, फेडरेशन झाले, महिला शेतमाल खरेदी करु लागल्या, मोठी आर्थिक उलाढाल होऊ लागली, हेच खरे परिवर्तनाचे प्रतीक आहे. शेतमाल खरेदीसोबत मार्केटींगही महत्वाचे आहे. महिला कंपन्यांनी खरेदी केलेल्या शेतमालाची विक्री करण्यासाठी नाशिकला मॉल उभा करण्याची मागणी केली. यासाठी सरकार काम करेल. आता केवळ उत्पादन नाही तर मार्केटींग महत्वाचे असून त्यासाठी महिलांनी विश्वासर्हता असणे गरजेचे आहे. त्यासाठी थेट विक्रीसोबत आताचा सामाजिक ट्रेड पाहून ऑनलाईन विक्रीलाही प्राधान्य द्यावे लागेल.’’ असे खासदार सुळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com