Supriya Sule : नीलेश लंके लोकसभेसाठी स्टार प्रचारक

आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख महिलांना मोहटादेवी दर्शन यात्रेच्या प्रारंभ प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झाला.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

Supriya Sule : राज्यात दोनच नेते आहेत, ज्यांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली. आर. आर. पाटील यांच्यानंतर आमदार नीलेश लंके यांचे नाव आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत चाहते असणारे नेते आहेत. त्यांच्यातील साधेपणा व मतदारांविषयी त्यांच्या मनात असलेली आपुलकी मोठी आहे. त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून आताच बुकिंग करून ठेवत आहोत. लोकसभेसाठी लंके राज्यभर फिरतील, असे मत खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी व्यक्त केले.

आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने पारनेर नगर मतदार संघातील एक लाख महिलांना मोहटादेवी दर्शन यात्रेच्या प्रारंभ प्रसंगी काल (ता. 27) खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी सुळे बोलत होत्या.

Supriya Sule
Supriya Sule : नाव चालतं, मग मुलगा, नातू का चालत नाही?

यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाबाजी तरटे, सुवर्णा धाडगे, राजेश्‍वरी कोठावळे, पुनम मुंगसे, विक्रमसिंह कळमकर, पारनेरच्या उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर, सुदाम पवार, अ‍ॅड. राहुल झावरे, दादा शिंदे, बापूसाहेब शिर्के, अर्जुन भालेकर, राणी लंके, डॉ.बाळासाहेब कावरे, कारभारी पोटघन, सचिन पठारे, राजेंद्र शिंदे, चंद्रकांत मोढवे, भूषण शेलार, श्रीकांत चौरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सुळे पुढे म्हणाल्या, की पुढे बसलेल्या प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर आमदार लंके यांचे भाषण ऐकताना एक अभिमान दिसत होता. राष्ट्रवादी काँग्रेसने काही निर्णय चुकीचेही घेतले असतील, परंतु नीलेश लंके यांना तिकीट देण्याचा घेतलेला निर्णय हा राज्यातील सर्वांत चांगला व योग्य निर्णय ठरला. चटई उचलणारा हा पहिलाच आमदार असेल. सर्वसामान्य जनता व मतदार माझे माय-बाप आहेत, असे मानणारा नेता आहे. त्यांच्या भाषणात त्यांनी पाच हजार सायकलची मागणी केली. भाषणात फिरून फिरून सायकलवरच येत होते इतका हा बाबा हट्टी आहे. त्यामुळे एकदाच काय तो निर्णय घेऊन टाकू. पुढील वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी पाच हजार सायकली देण्यात येतील.

Supriya Sule
Supriya sule video : '५० खोके, तरूणांना धोके'

ही अभिमानाची गोष्ट

देवदर्शनासाठी राणीताई आणि नीलेश लंके हे दोघेही जाणार आहेत. पहिल्या गाडीत राणीताई, तर शेवटच्या गाडीत नीलेश लंके असतील. पुन्हा येताना प्रत्येक माऊली तिच्या घरी जाईपर्यंत लंके घरी जाणार नाहीत. ही अभिमानाची गोष्ट आहे. हा मतदारसंघ नव्हे, तर तुमचे कुटुंब आहे, असेही खासदार सुळे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com