Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईचा प्रचंड धसका : शासकीय गाड्यांचा ताफा दिसताच व्यापाऱ्यांची धांदल, दुकाने बंद

Loni Kalbhor: तुकाराम मुंढेंचा प्रचंड धसका : शासकीय गाड्यांचा ताफा दिसताच व्यापाऱ्यांची धांदल, दुकाने बंद, पण अधिकारी निघाले वेगळेच
Tukaram Munde
Tukaram MundeSarkarnama
Published on
Updated on

IAS Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सध्या राज्यभरात धडक कारवाया सुरु आहेत. हॉटेल, ढाबे, डेअरी आणि उत्पादन कंपन्यांमध्ये छापेमारी केली जात आहे. मुंढे यांच्या याच कारवाईचा धसका राज्याच्या ग्रामीण भागातील सामान्य लोकांनीही घेतल्याचे पुण्यातील लोणी-काळभोर येथे दिसून आले.

महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी मंगळवारी लोणी काळभोर येथे दौरा केला. यात त्यांनी शेतकरी व वितरकांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांना मार्गदर्शन केले. परंतु शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफा अचानक दाखल झाल्यानंतर कृषी भांडारांवर मोठी कारवाई सुरू झाल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली.

अनेकांना ही तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न व औषध प्रशासन विभागाचीच कारवाई असल्याचे वाटले. त्यामुळे अनेक व्यापारी, कृषी केंद्र चालक आणि व्यावसायिकांनी संभाव्य कारवाईच्या भीतीने दुकाने बंद करण्याची तयारीही सुरू केली. परिसरातील अनेक व्यावसायिकांनी एकमेकांना फोन करून माहिती घेण्यास सुरुवात केली.

परंतु हा दौरा मांढरे यांचा असून तो कारवाईसाठी नाहीतर पूर्वनियोजित होता, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि खतांच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी कृषी आयुक्त आले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर मांढरे यांनी येथील जनसेवा कृषी विकास केंद्राला भेट देऊन विक्रेते दिनकर शिंदे आणि उपस्थित शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

Tukaram Munde
Tukaram Mundhe FDA Vs Goras Bhandar : तुकाराम मुंढे यांच्या 'FDA'च्या कारवाईवरून वाद; 600 दूध उत्पादक शेतकरी, 5 हजार ग्राहक आक्रमक, मंत्रालयापर्यंत लढा नेण्याची तयारी

मान्सूनपूर्व हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने राज्यभर सुरू केलेल्या पाहणी मोहिमेअंतर्गत कृषी आयुक्त सूरज विविध बाबींचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या बी-बियाणे, खते आणि कृषी निविष्ठांच्या पुरवठ्याबाबत माहिती घेतली तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी सीड्सचे साथी पोर्टल व मोबाईल अ‍ॅपबाबत सविस्तर माहिती दिली. अ‍ॅपच्या वापराचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण देण्यात आले. तसेच कृषी निविष्ठांची ऑनलाईन विक्री कशी करावी, व्यवहारांची नोंद कशी ठेवावी आणि शेतकऱ्यांना अधिक पारदर्शक सेवा कशी द्यावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

Tukaram Munde
Tukaram Munde Kidnapping: 5 कोटींच्या खंडणीसाठी बीडच्या तुकाराम मुंडेंचे अपहरण; पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच, डोळ्यांवर पट्टी बांधून रस्त्यावर सोडले

बोगस बी-बियाणे आणि खतांबाबत कठोर इशारा

दौऱ्यादरम्यान सूरज मांढरे यांनी बनावट बी-बियाणे, खते आणि कृषी औषधांच्या वाढत्या समस्येवर चिंता व्यक्त केली. अशा निकृष्ट किंवा बनावट साहित्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शेती उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो, असे त्यांनी नमूद केले. “शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच साहित्य खरेदी करावे. कुठेही बोगस बी-बियाणे, खते किंवा औषधांची विक्री होत असल्याचे आढळल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी. दोषींना कोणतीही गय केली जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com