सैराट फेम प्रिन्स म्हणतो, माझीच फसवणूक झाली...

Crime news| चौकशीनंतर त्याला सोमवारी (२७ सप्टेंबर) पुन्हा चौकशीसाठी येण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
Crime news|
Crime news|
Published on
Updated on

राहुरी : मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातल्याप्रकरणी सैराट फेम प्रिन्स उर्फ सुरज पवार याचा शुक्रवारी (२३ सप्टेंबर) राहुरी पोलिसांनी जबाब नोंदवला. चौकशीनंतर त्याला सोमवारी (२७ सप्टेंबर) पुन्हा चौकशीसाठी येण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

महेश बाळकृष्ण वाघडकर (रा. भेंडा फॅक्टरी, ता. नेवासा) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दोन लाखांची फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर या प्रकरणी दत्तात्रेय अरुण क्षीरसागर (रा. नाशिक), आकाश विष्णू शिंदे, ओंकार नंदकुमार तरटे ( रा. संगमनेर), विजय बाळासाहेब साळे (वय ३७, रा. खडांबे बु., ता. राहुरी) यांना पोलिसांनी अटक केली.

Crime news|
Love Jihad : नवा कायदा येणार ; अधिवेशनात मांडणार विधेयक : अनिल बोंडे

आरोपी तरटे याने दिलेल्या जबाबानुसार, संबंधित आरोपींनी वाघडकर यांच्या खोट्या नियुक्तीपत्रावर राजमुद्रेचा गोल व आडवा शिक्का मारला होता. हे शिक्के तयार करताना आरोपी शिंदेसोबत सुरज पवारही होता. त्यामुळे सुरज पोलिसांच्या रडारवर आला. नोटीस काढून पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात हजर होण्याची बजावली होती.

पण सूरजने या सर्व प्रकरणावर वेगळाच खुलासा केला आहे. या प्रकरणात माझीच फसवूण झाल्याचा दावा सूरजने केला आहे. ''या गुन्ह्यातील आरोपी आकाश शिंदेला आपण ओळखतो. शिंदेने मला संगमनेर येथील चित्रपट निर्माते डॉ. डेरे यांच्या "संविधान" चित्रपटात भूमिका मिळवून दिली. चित्रपटासाठी साडेसहा लाखांचे मानधन ठरले होते. त्यानुसार चित्रपटाच्या करारावर सही केल्यानंतर तीन लाखांचा ॲडव्हान्स मिळाला. त्यांपैकी शिंदेला दोन लाख रुपये दिले. नंतर आणखी पन्नास हजार रुपयेही त्याला दिले. पण कोरोना महामारीमुळे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही, असं सूरजने म्हटलं आहे.

Crime news|
Congress: पक्षातून गेलेल्यांना पुनश्‍च काँग्रेसमध्ये आणणार!

तर सूरजचे वकील दीपक शामदीरे म्हणाले की, आकाश शिंदेने चित्रपटासाठी तयार केलेल्या शिक्क्यांचा गैरवापर करत आर्थिक फसवणुक केली. सुरज पवारचा या गुन्ह्याशी कोणताही संबंध नाही. शिंदे यानेच त्याची अडीच लाखांची फसवणूक केली आहे. पण सूरजचे नाव घेतल्याने त्याची नाहक बदनामी झाली. त्यामुळे काही चित्रपट निर्मात्यांनीही त्याला भूमिकेतून वगळले आहे."

दरम्यान या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज पवार यांच्या बँकेच्या खात्यांमधील आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठीच त्याला सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलविले आहे."

कोण आहे प्रिन्स?

सुरज बैलगंग्या पवार (वय २२, मुळ रा. करमाळा, जि. सोलापूर, हल्ली मु. कात्रज, जि. पुणे) याच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी आईचे कर्करोगाने निधन झाले. वडिलांनी दुसरे लग्न केले. सुरज त्याच्या आजीकडे राहू लागला. वयाच्या चौथ्या वर्षी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पिस्तुल्या चित्रपटात भूमिका दिली. त्यातील भूमिकेसाठी त्याला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. नंतर फॅन्ड्री, सैराट अशा सुपरहिट चित्रपटांमधून त्याची भूमिका गाजली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com