Congress: पक्षातून गेलेल्यांना पुनश्‍च काँग्रेसमध्ये आणणार!

नाशिक जिल्हा काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार करून सक्रीय होण्याचे आवाहन.
Dr. Raju Waghmare
Dr. Raju WaghmareSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : एकेकाळी नाशिक काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला होता. मधल्या काळात काही कारणामुळे तो हातून गेला. मात्र, यापुढे पक्षाला पुन्हा उभारी मिळवून दिली जाणार आहे. त्यासाठी जे पक्षातून गेले व पक्षात निष्क्रीय (Inactive)आहेत त्यांना पुनश्‍च पक्षाकडे वळविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पक्षाचे जिल्हा प्रभारी डॉ. राजू वाघमारे (Dr. Raju Waghmare) यांनी केले. (Congress will reorganise party in NashikDistrict)

Dr. Raju Waghmare
Shivsena: मुख्यमंत्री शिंदे गटाचा भाजपला ‘दे धक्का’

डॉ. वाघमारे नाशिक दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी शहर व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मनोगत जाणून घेतले. यावेळी जिल्हा काँग्रेसला गत वैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार शनिवारी पक्षाचे जिल्हा प्रभारी डॉ. राजू वाघमारे यांनी व्यक्त केला.

Dr. Raju Waghmare
ShivsenaNews: शिंदे गटात सहभागी होण्यासाठी दबाव आणि बळजबरी?

डॅा. वाघमारे म्हणाले, काँग्रेस पक्षाने सामान्यांच्या प्रश्नावर सतत संघर्ष केला आहे. सामान्य नागरिक, मध्यमवर्गीयांच्या कल्याणासाठी काम करणारा हा एकमेव पक्ष आहे. सध्या राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु करून देशात एकता,बंधुता व सर्व धर्मांत सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्याचा मोठा प्रयत्न सुरु केला आहे. त्याने केंद्र सरकार धास्तावले आहे. सामान्य कार्यकर्त्यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन सामान्यांमध्ये वातावरण निर्मिती करावी.

ते म्हणाले, यापुढे रस्त्यावर आंदोलन करून जनसामान्यांचे प्रश्‍न मांडले जातील. सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या धोरणावर कडाडून हल्ला केला जाईल. आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवून देण्याचा निश्‍चीत प्रयत्न केला जाईल.

बैठकीत आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी भाजपच्या धोरणावर सडकून टीका केली. पदवीधर मतदारसंघाचा आपला बालेकिल्ला कायम राखण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. दिलीप पाटील, विनायक सांगळे, सुनील आव्हाड यांनी कार्यकर्त्यांच्या भावना निदर्शनास आणून दिल्या.

या वेळी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, शाहु खैरे, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, ज्ञानेश्‍वर गायकवाड, ज्ञानेश्‍वर काळे, सुनील आव्हाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com