Suresh Halvankar : हळवणकरांना त्यागाचे फळ मिळणार? 12 आमदारांच्या निकालाची याचिका फेटाळल्याने मार्ग मोकळा

High court rejects plea on 12 Governor Nominated MLA : बारा राज्यपाल नियुक्त आमदारांची ठाकरेंच्या शिवसेनेची याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर उर्वरित पाच आमदारांची नियुक्ती लवकरच होणार आहे.
Suresh Halvankar
Suresh Halvankar Sarkarnama
Published on
Updated on

विधानसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारीचा त्याग करून पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या आमदार राहुल आवाडे यांना उमेदवारी देण्यास सहमती माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी दिली होती. या त्यागाचे फळ आता हळवणकर यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बारा राज्यपाल नियुक्त आमदारांची ठाकरेंच्या शिवसेनेची याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर उर्वरित पाच आमदारांची नियुक्ती लवकरच होणार आहे.

यामध्ये इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे इचलकरंजीला दुसरा आणि कोल्हापूर जिल्ह्याला तेरावा आमदार मिळण्याची संधी आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची ठाकरेंच्या शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. अशातच महायुतीने महाविकास आघाडीची यादी परत घेऊन त्यात बदल करून सात आमदारांची नियुक्ती केली आहे.

उर्वरित पाच आमदार नियुक्त होणे बाकी आहेत. यातील उर्वरित पाच आमदारांमध्ये इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नावाची शक्यता वर्तवली जात आहे. तर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील सुरेश हाळवणकर यांना लवकरच गोड बातमी दिली जाईल, असे संकेत दिले होते.

Suresh Halvankar
Sanjay kaka Patil : सांगलीत अजितदादांना मोठा धक्का? संजयकाका पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर; 'घड्याळा'ची साथ सोडणार?

दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाच्या निर्णयानुसार हाळवणकर यांनी उमेदवारीचा त्याग केला होता. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याबाबत चर्चा झाली होती. आता या नव्या घडामोडीमुळे इचलकरंजीला नजिकच्या काळात आणखी एक आमदार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Suresh Halvankar
Gokul News : निवडणुकीत एकमेकांविरोधात भांड भांड भांडले, आता तेच नेते 'गोकुळ'मध्ये एकाच व्यासपीठावर

तत्कालीन वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) इचलकरंजीत आले होते. त्यांनी हाळवणकर यांना विधान परिषदेवर घेण्यात येईल, असे जाहीरपणे सांगितले होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही निवडणूक प्रचारावेळी इचलकरंजीला दोन आमदार मिळतील, असे भाकीत केले होते. दरम्यान राजकीय घडामोडीनंतर हळवणकर यांना संधी मिळेल का हेच पाहणे आता महत्त्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com