
Kolhapur News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकलेले नेते गोकुळच्या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील आमदार खासदार आणि मंत्र्यांचा कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित केला आहे.
खासदार आणि मंत्रीपदाची निवड झालेल्या कोल्हापुरातील नेत्यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला असल्याने महायुती मधील विद्यमान मंत्री आणि महाविकास आघाडीचे नेत्यांचा सत्कार होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेस नेते सतेज पाटील असणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापुरातील राजकीय रंग गोकुळाच्या (Gokul News ) व्यासपीठावर रंगणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती विजयी झाले. तर हातकणंगले मधून महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने विजयी झाले. त्यानंतर विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना संधी मिळाली आहे.
कोल्हापूरच्या भूमिपुत्रांचा सत्कार होण्याच्या अनुषंगाने कोल्हापूर दूध उत्पादक संघ गोकुळच्या वतीने विशेष सत्काराचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील आहेत.
महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते एकत्र व्यासपीठावर येणार असल्याने कार्यक्रमात राजकीय चिमटे निघतील, असेच एकंदरीत चित्र आहे. गोकुळ दूध संघात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची आघाडी आहे.
गोकुळच्या परंपरेनुसार जिल्ह्यातील मंत्री आणि खासदारांचा सत्कार नेहमीच आयोजित केला जातो. मात्र, यंदा राज्यातील सत्तेत मुश्रीफ आणि पाटील एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे गोकुळच्या या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी रंगणार हे निश्चित मानले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.