Suresh Halvankar : बावनकुळेंसमोरच भाजपमधील 'नवा-जुना' वाद उफाळला; हाळवणकर समर्थक आक्रमक

Suresh Halvankar Melava at ichalkaranji : हाळवणकर यांची पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी आज होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कार्यकर्त्यांना संबोधन करणार आहेत.
suresh halvankar
suresh halvankarSarkarnama
Published on
Updated on

Ichalkaranji News: इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज इचलकरंजी दौऱ्यावर आहेत. भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या समर्थनार्थं कार्यकर्त्यांचा मेळावा इचलकरंजीत पार पडत आहे.

आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हाळवणकर समर्थकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे हाळवणकर यांची पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी आज होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कार्यकर्त्यांना संबोधन करणार आहेत.

आमदार प्रकाश आवाडे (Prakash Avade) हे भाजप नेते सुरेश हाळवणकर यांचे राजकीय कट्टर विरोधक आहेत. मात्र आमदार आवाडे यांच्या भाजप प्रवेशामुळे सुरेश हाळवणकर यांच्या उमेदवारीची गोची निर्माण झाली आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला जाणार आहे. मात्र भाजपकडून उमेदवारीचा शब्द घेऊनच आवाडे यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर हाळवणकर यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी हाळवणकर यांनी देखील इच्छा व्यक्त करून दाखवली आहे. मात्र त्यांचे राजकीय पुनर्वसन करून हाळवणकर यांना विधान परिषदेवर घेण्याची तयारी भाजपने (BJP) केली होती. मात्र राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न निकाली लागल्यानंतर दोन दिवसांपूर्वी काही आमदारांचा शपथविधी पार पडला. शपथविधीमध्ये हाळवणकर यांचे नाव नसल्याने त्यामध्ये आणखी नाराजी वाढली आहे.

suresh halvankar
Ruturaj Patil vs Amal Mahadik : कोल्हापूर दक्षिणमध्ये 'अमल-ऋतूराज' मध्येच बिगफाईट; विकासाचा मुद्दा ठरणार निर्णायक

या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी येथे माजी आमदार सुरेश हाळवणकर (Suresh Halvankar) यांच्या गटाचा मेळावा आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर हाळवणकर समर्थकांनी मेळाव्यास्थळी पोस्टरबाजी करत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच नव्हे तर भाजपचे जेष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे कार्यकर्ता प्रति असणारी भावना दाखवणारे पोस्टर या मेळाव्यात प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आले आहे.

" मेरी एक बात गाठ बांध लेना, हमारा एक भी पुराना कार्यकर्ता टूटना नही चाहिये!, नये चाहे दस टूट जाये, क्यूकी पुराना कार्यकर्ता हमारी जीत की ग्यारंटी है! नये कार्यकर्ता पर विश्वास करना जल्दबाजी है. अशा आशयाचे फलक प्रवेशद्वारावरच लावण्यात आले आहे.

suresh halvankar
Kolhapur Assembly Election : उत्तरेत शिंदेसेनेचं भवितव्य काँग्रेसचा उमेदवार ठरवणार

दरम्यान प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे स्थळी येत असताना कार्यकर्त्यांनी अनोखे पोस्टर दाखवत त्यांचे स्वागत केले. माजी आमदार हळवणकर यांचा फोटो असलेल्या पोस्टरवर 'निष्ठेचा हाच का न्याय?'असे फलक दाखवत बावनकुळे यांचे स्वागत करण्यात आले.

मेळाव्यात माजी आमदार सुरेश हळवणकर हे भाषणासाठी उभे राहिले असताना कार्यकर्त्यांनी हेच गोष्ट दाखवले. मात्र कार्यकर्त्यांना हाळवणकर यांनी दरडावले. अशी पोस्टरबाजी करून चालणार नाही याचा फटका आपल्यालाच बसेल. असे सांगत कार्यकर्त्यांना पोस्टर खाली करण्यास सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com