सुशीलकुमार शिंदे म्हणाले, मी रिटायर झालेला माणूस आता मला कोण विचारतो

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी काल सोलापूरात कॉंग्रेस भवन येथे बैठक घेतली.
Sushilkumar Shinde
Sushilkumar Shinde

Sarkarnama

Published on
Updated on

सोलापूर : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी अनेकदा संघर्षकाळ अनुभवला आहे. मात्र, त्यांनी राजकारणात काम करत असतांना आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते केंद्रीय गृहमंत्रिपदापर्यंत मजल मारली. संघर्षातूनच त्यांना यश मिळत असतानाच त्यांच्याभोवती पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा गराडाही वाढत होता. त्याच जोरावर महापालिकेत कॉंग्रेसला (Congress) सोलापूरात सत्ताही मिळाली. मात्र, 2014 च्या मोदी लाटेनंतर झालेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांना पराभव बघावा लागला. त्यानंतर त्यांचा प्रभाव हा कमी होत चालला आहे. दरम्यान, आता आपण निवडणूक लढविणार नसल्याचे सांगत त्यांनी मी रिटायर झाल्याचे स्पष्ट केले. ते काल (ता.27 डिसेंबर) सोलापूरात झालेल्या कॉंग्रेस भवनातील बैठकीवेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Sushilkumar Shinde
भाजपचा दे धक्का! काँग्रेसच्या दोन आमदारांसह विरोधकांचे माजी आमदार अन् माजी खासदार फोडले

शिंदे म्हणाले, आता येथून पुढे आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या नेता असतील. मी रिटायर झालेला माणूस आता मला कोण विचारतो, असे मिश्किलपणे त्यांनी सांगितले. आगामी सोलापूर महापालिका निवडणूकीची (SMC Election-2022) सुत्रे व राजकारण आपण प्रणिती शिंदे यांच्याकडून घेणार का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधीने त्यांना विचारला होता यावर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.

Sushilkumar Shinde
नारायण राणे संतापले म्हणाले, 'कोण अजित पवार, मी नाही ओळखत!'

सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत म्हटल्यावर तासन्‌तास त्यांची रेल्वे स्थानकावर वाट पाहणारे पदाधिकारी, कार्यकर्ते आता तेवढ्या प्रमाणात पाहायला मिळत नाहीत. शहर- ग्रामीणमधील अनेकांना त्यांनी राजकारणात विविध पदांवर संधी दिली. तरीही, अनेकांनी त्यांची साथ सोडली. कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल (Sudhir Khatmal) यांच्या राजकीय वाटचालीत शिंदे यांचे योगदान मोठे असल्याचे बोलले जाते. तरीही, त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत हाती 'घड्याळ' बांधले. एवढेच नाही, तर आमदार प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस धूमधडाक्‍यात साजरा होत असतानाच खरटमल यांनी कॉंग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांसह काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांना धक्‍का दिला आहे.

कॉंग्रेस भवन असो वा सुशीलकुमार शिंदे किंवा आमदार प्रणिती शिंदे यांच्या शहरातील कोणत्याही कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहणारे पदाधिकारीच मात्र या बैठकीत दिसले नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com