Sushma Andhare : '' शिंदे फडणवीस सरकारने काय खेळ लावलाय; उद्योग गुजरातला, गावं कर्नाटकला आणि मंत्री गुवाहाटीला...''

Sushma Andhare: एकनाथ शिंदे यांचा गेम भाजपच करणार आहे.
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama

Sushma Andhare News: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा राज्यात सुरु आहे. या यात्रेत त्यांच्याकडून भाजप व शिंदेगटावर जोरदार हल्लाबोल देखील सुरु आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अंधारे यांचे संत परंपरा, वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या काही आक्षेपार्ह विधानांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. यानंतर वारकरी संप्रदायाने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारल्यामुळे अंधारे चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. मात्र,तरीदेखील त्यांची शिंदे फडणवीस सरकारवरील टीकेची धार कमी झालेली नाही. त्यांनी आता राज्यातील परिस्थितीवर भाष्य करत उद्योग गुजरातला, गावं कर्नाटकला आणि मंत्री गुवाहाटीला अशी खरमरीत टीका केली आहे. (Sushma Andhare criticism on Eknath Shinde and Devendra Fadnavis government)

सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सोलापूरमध्ये दाखल झाली आहे. यावेळी अंधारे बोलत होत्या. अंधारे म्हणाले, राज्यात येणारे प्रत्येक प्रकल्प परराज्यात का जात आहेत असा सवालही त्यांनी यावेळी केला. यावेळी त्या म्हणाल्या की, उद्योग गुजरातला, गावं कर्नाटकला आणि मंत्री गुवाहाटीला जात आहेत. राज्यातील या सरकारने काय खेळ लावला आहे.

Sushma Andhare
Ajit Pawar : जयंत पाटलांसाठी अजितदादांची उपमुख्यमंत्र्यांना विनंती; फडणवीस म्हणाले...

तसेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गेम भाजपच करणार आहेत.आणि शिंदे गटातील 20 आमदार भाजपमध्ये जाणार असून त्यात शहाजी बापू पाटील व तानाजी सावंत हे सर्वात पहिल्यांदा भाजपात दाखल जातील असेही अंधारे यांनी यावेळी सांगितले.

ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानं केली आहेत. त्यांचा राजीनामा भाजपमधील एकही नेता मागत नाही असा हल्लाबोलही अंधारे यांनी केला आहे.

Sushma Andhare
Uddhav Thackeray कडाडले; भाजपने टाकली गुगली, शिंदे गट अडचणीत !

केंद्र सरकारच्या धोरणामुळे महागाईचा फटका जनसामान्यांना कसा बसला आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी एक तरी पत्रकार परिषद घेतली आहे का असा सवाल उपस्थित करतानाच ते पत्रकार परिषद घेत नाहीत, कारण त्यांना त्याची भीती वाटते असा टोमणाही मोदींना मारला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com