Sushma Andhare : चाकणकरांची प्रसिद्धी? सुषमा अंधारे भडकल्या; म्हणाल्या,'कोण चाकणकर? त्या काय रश्मिका मंदाना...!'

Sushma Andhare On Rupali Chakankar : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावरून राज्य महिला आयोगाच्या काराभारावर टीका होत आहे. यावरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विरोधकांनी चाकणकर धारेवर धरले आहे.
Vaishnavi Hagwane Case Sushma andhare And Rupali Chakankar
Vaishnavi Hagwane Case Sushma andhare And Rupali Chakankarsarkarnama
Published on
Updated on

Pune News : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. महाविकास आघाडीतील महिला नेत्या आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. आज महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत महिला आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अध्यक्ष बदलावा, अशी मागणी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या मागणीनंतर रूपाली चाकणकर आणि अंधारे यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं.

आज राज्यपालांन समवेत महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या शिष्टमंडळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, जयश्री शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रज पवार पक्षाच्या रोहिणी खडसे विद्या चव्हाण काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड आदी सहभागी होत्या.

राज्यपालांच्या घेतलेल्या भेटीबाबत रूपाली चाकणकर यांना विचारला असता चाकणकर म्हणाल्या, महिला आयोगाच्या पदावर ती राजकीय व्यक्ती असू नये अशी मागणी या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र महाविकास आघाडी असताना माझी महिला आयोगावर निवड झाली होती. तेच आता म्हणत आहे की महिला आयोगावर राजकीय व्यक्ती नको. महाविकास आघाडीतील महिला नेत्यांनी एक काय ते ठरवावे. सत्तेत असताना एक आणि विरोधात असताना एक, अशी भूमिका घेऊन नये. हे लोकांना सुद्धा पटत नाही. प्रत्येकाला टीका आणि तक्रार करण्याचा अधिकार आहे. महिला आयोगावर बोलल्यावर प्रसिद्धी मिळते असे मला वाटते. त्यामुळे ते प्रसिद्धीसाठी महिला आयोगावर टीका करतात.

Vaishnavi Hagwane Case Sushma andhare And Rupali Chakankar
Sushma Andhare On Chitra Wagh: सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातूनच वाघांवर हल्ला चढवला; म्हणाल्या,'बाई सोयीनुसार...'

या चाकणकरांच्या प्रतिक्रिया नंतर सुषमा अंधारे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अंधारे म्हणाल्या, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायद्याचा परिघ ज्ञात असणारी व्यक्ती असावी. आयोगाची रिक्त असणारी सदस्य पदे तात्काळ भरली जावीत. विभागीय कार्यालय सुरू व्हावीत. आयोगाचा राजकीय पक्षपाती दृष्टिकोन टाळण्यासाठी अ राजकीय व्यक्तीची नेमणूक व्हावी. अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे.

अंधारे पुढे म्हणल्या, महिला आयोगावर पूर्ण वेळ काम करणारी अध्यक्षा असावी. ज्याला कायद्याचा परीघ आहे माहित आहे, अशा महिलेला अध्यक्षा करावी अशी मागणी राज्यपालांकडे केली. रूपाली चाकणकर रश्मिका मंदना किंवा स्मृती इराणी आहेत का? कोण चाकणकर आहेत? राजकारण बॉलीवूड प्रशासनातील त्या प्रमुख आहेत का? चाकणकर कोण आहेत? की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी मिळते. काही लोकांना फार मोठे गैरसमज असतात. त्यांनी अशा अंधश्रद्धेतून बाहेर यावं.

Vaishnavi Hagwane Case Sushma andhare And Rupali Chakankar
Sushma Andhare on Shirsat : सिद्धांत शिरसाटच्या विरोधातील तक्रार मागे घेताच सुषमा अंधारे आक्रमक; संजय शिरसाटांची कार्यपद्धतीच काढली

दरम्यान रोहिणी खडसे यांनी देखील जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी आयोगाची सध्याची भूमिका ही बैल गेला आणि झोपा झाला अशी आहे. फक्त वेळ वाया घालवून लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम अशा बैठकीतून केला जातोय. पण आयोगाच्या अध्यक्षांना यात का जबाबदार धरले जात नाही. त्यांचा राजीनामा न घेता बैठक घेण्याचा वेळ काढू पणा सरकार करत असल्याची टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे. तसेच त्यांनी चाकणकर या अकार्यक्षम अध्यक्षा असून त्यांनी त्यांचा पदाचा राजीनामा द्यावा अशीही मागणी रोहिणी खडसे यांनी केलीय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com