BJP Counter Attack : ज्योती वाघमारेंना खासदारकी मिळाल्याने सुषमा अंधारेंच्या डोक्यावर परिणाम झालाय : भाजपचा पलटवार

Sachin Kalyanshetti- Devendra Kothe Reply Sushma Andhare : सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गुन्ह्यांवरून हल्लाबोल केला. त्याला भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे यांनी प्रत्युत्तर देत अंधारेंवर जोरदार टीका केली.
Devendra Kothe-Sushama Andhare-Sachin Kalyanshetti
Devendra Kothe-Sushama Andhare-Sachin KalyanshettiSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 11 August : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील गुन्ह्यांची यादी वाचत त्यांची कुंडलीच मांडली. गोरे यांच्यावरील आरोपाला भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे यांनी खरमरीत शब्दांत उत्तर दिले आहे. अंधारेंचा पायगुण असा आहे की, त्या शिवसेनेत गेल्या आणि शिवसेनेचं अस्तित्वच संपल्यासारखं झालं आहे, असा टोला कल्याणशेट्टी यांनी तर अंधारेंना सोलापुरात आल्यानंतर खासदार ज्योती वाघमारे दिसत असाव्यात, त्या नैराश्यतून बडबड करत असाव्यात, असा टोला आमदार कोठेंनी लगावला.

आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, सुषमा अंधारे आणि त्यांच्या शिवसेनेला राज्यात कोणीही विचारत नाही. पण काहीतरी मिळेल या उद्देशाने जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली. अंधारे यांनी हिंदुत्ववादी विचारांना आणि बाळासाहेब ठाकरे यांना प्रखर विरोध केला. अंधारेंचा पायगुण असा आहे की, त्या शिवसेनेत गेल्या आणि त्यांच्या शिवसेनेचं अस्तित्वही संपल्यासारखं झालं आहे.

जयकुमार गोरे हे जिल्ह्यात आल्यानंतर आमदार, नगरसेवक अशी ताकद निर्माण केली आहे. पण, सुषमा अंधारे आल्या आणि त्यांच्या मागे साधा सरपंचही दिसला नाही. सार्वजनिक जीवनात काम करत असताना आमच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. अंधारे ज्या पक्षात काम करतात त्या पक्षातील नेत्यांच्या गुन्ह्यांची यादी वाचून दाखवावी, असे आवाहन कल्याणशेट्टींनी केले.

ते म्हणाले, मुंबई महापालिकेत तुमच्या पक्षाने काय काय केलं, याची यादी आम्ही वाचून दाखवू शकतो. पण, आम्ही व्यक्तिगत टीकाटिपणी करण्यापेक्षा विकासाच्या राजकारणावर भर देतो. संजय राऊत, अंधारे यांनी टीका केली म्हणजे याचा अर्थ असा होतो की, जयकुमार गोरे हे विरोधकांना टोचायला लागले आहेत.

सुषमा अंधारे या पंक्तीला बसल्या आणि जेवण संपलं अशी परिस्थिती आहे. त्यांनी संपूर्ण हयात बाळासाहेब ठाकरेंवर द्वेषाने टीका केली आणि हिंदू देवतांचा अपमान केला, उद्धव ठाकरेंवर टीका केली. व्यावसायिक भाषणकर्त्या असणाऱ्या सुषमा अंधारे यांनाही अमोल मिटकरीसारखं आपणाला ही आमदारकी मिळेल म्हणून शिवसेनेत गेल्या. मात्र त्यांच्या पायगुणाने शिवसेनेची वाताहत झाली, असा टोला आमदार देवेंद्र कोठेंनी लगावला.

Devendra Kothe-Sushama Andhare-Sachin Kalyanshetti
Top 10 News: मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा मोठा अपघात ते महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल

कोठे म्हणाले,शिवसेनेची वाताहत झाली, नेमकं त्याचवेळी आमच्या सोलापूरच्या भीमकन्या ज्योती वाघमारे यांना खासदारकी मिळाली. त्यामुळे सुषमा अक्का यांना प्रचंड नैराश्य आले असून त्या वैफल्यग्रस्त झाल्या आहे. त्यांच्या डोक्यावर आणि मनावर परिणाम झाला आहे.

जस सकाळी तिकडे नऊला भोंगा वाजतो त्याचप्रमाणे जाईल तिथं भाजपच्या काम करणाऱ्या नेत्यांवर टिका करण्याचे काम या दोघांकडून होत आहे. मुळात या दोघांमुळेच पक्ष संपलेला असून जे काही शिवसैनिक आहेत,ज्यांची बाळासाहेबांवर निष्ठा आहे ती सर्व लोक भाजप महायुती बरोबर जोडले गेले आहेत, असे कोठेंनी सांगितले.

आमदार कोठे म्हणाले, जयकुमार गोरे हे स्वकर्तृत्वावर चार वेळा निवडून आले असून सोलापूरसह सांगली,सातारा,माढा,धाराशिवमध्ये पक्ष संघटन वाढवलं आहे. अंधारे यांच्याकडे ग्रामपंचायतीत शंभर मत घेणारी लोकसुद्धा बाजूला बसायला नसल्यामुळे ही लोक आरोप करून व्यक्ती चरित्र्यावर बोलण्याचं काम करतात. एखाद्या माणसाला विकासातून किंवा त्याच्या कामातून थांबवता येत नसतं, तेव्हा तो व्यक्तिगत टिका करतो.

सुषमा अंधारे यांचा द्वेष हा जयकुमार गोरे यांच्यावर नसावा, त्या सोलापुरात आल्यामुळे सतत समोर खासदार ज्योती वाघमारे दिसत असाव्यात. त्या नैराश्यतून त्यांची झालेली ती बडबड असावी. भाजपचं कोणीही नाराज नाही, भाजपचा मतदार हा पक्षासोबत असतो, त्यामुळे मागच्या सर्व निवडणुकीत भाजप एकतर्फी जिंकलेली आहे, असे उत्तर कोठेंनी अंधारेंना दिले.

Devendra Kothe-Sushama Andhare-Sachin Kalyanshetti
Manoj Jarange Patil : सांगलीत मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात; 2 ते 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या; तर कराडात बैठकीचे बॅनर फाडले

ते म्हणाले, सोलापूरला येऊन स्वतःच्या पक्षाच्या लोकांना न भेटता दुसऱ्या पक्षाच्या लोकांना त्या भेटत असतील तर त्यांच्याकडे पक्ष शिल्लक राहिला नाही हे सिद्ध होतंय. त्यांच्याकडे पक्षाचा अजेंडा नाहीये, पक्ष संघटना कशी वाढवायची याचे त्यांच्याकडे मुद्दे नाहीत, त्यामुळे ते दुसऱ्याकडे बोट करतायत. सुषमा अंधारे यांची विचारधारा उलट राहिलेली आहे त्यामुळे आयुष्यभर ज्यांच्यावर टिका केली त्यांच्याकडे जाऊन पदरात कांही पडतंय का, यासाठी धडपड सुरू आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com