Manoj Jarange Patil : सांगलीत मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात; 2 ते 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या; तर कराडात बैठकीचे बॅनर फाडले

Manoj Jarange Patil Convoy Accident : या अपघातामध्ये मनोज जरांगे यांचे समर्थक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात जखमी झालेल्यांना मनोज जरांगे यांनी स्वत: आपल्या कारमध्ये बसवून रुग्णालयात दाखल केलं आहे. मात्र, अचानक झालेल्या अपघातामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता.
Manoj Jarange Patil Convoy Accident
Manoj Jarange Patil Convoy AccidentSarkarnama
Published on
Updated on

Sangli News, 11 Aug : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू आहे. या दौऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत जरांगे पाटील त्यांच्याशी संवाद साधत आहेत.

त्यांचा हा दौरा सांगली जिल्ह्यात आला असता त्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सांगलीतील कडेगाव येथून विटा शहराकडे त्यांचा ताफा निघाला असताना ही अपघाताची घटना घडली.

या अपघातामध्ये मनोज जरांगे यांचे समर्थक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात जखमी झालेल्यांना मनोज जरांगे यांनी स्वत: आपल्या कारमध्ये बसवून रुग्णालयात दाखल केलं आहे. मात्र, अचानक झालेल्या अपघातामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

Manoj Jarange Patil Convoy Accident
Buldhana Crime : गावच्या राजकारणाला कंटाळून लोकनियुक्त सरपंचाने संपवलं जीवन; मृत्यूपूर्वी बनवलेल्या व्हिडिओतून केला खळबळजनक खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे हे आज विटा शहरात येणार आहेत. कडेगावमधून ते विटा येथे निघाले होते. त्याचवेळी त्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झाला. दोन ते तीन वाहनं एकमेकांवर धडकली. मनोज जरांगे यांच्या स्वागतावेळी स्वागत मार्गावर प्रचंड गर्दी झाली होती. त्याचवेळी ही अपघाताची घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, आज कराड तालुक्यातील मसूर आणि पाचवड फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांची बैठक होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी शामगाव घाट ते मसूर मार्गावर उभारण्यात आलेले बॅंनर अज्ञाताकडून फाडण्यात आल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांनी मल्हारपेठ- पंढरपूर आणि कराडकडे जाणाऱ्या शामगाव घाटातील रस्त्यावर रास्तारोको केला आहे.

Manoj Jarange Patil Convoy Accident
Donald Trump : इराणच्या हत्येच्या धमकीनंतर ट्रम्प घाबरले? चक्क केटरिंग ट्रकमध्ये लपूनछपून केला प्रवास, 'तो' व्हिडिओ आला समोर

मसूर पोलिसांनी आंदोलकांना विनंती करत हटविले आहे. सध्या मसूर पोलिस ठाण्यात बॅंनर फाडणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाज दाखल झाला आहे. आज कराडला मनोज जरांगे पाटील मुक्कामी आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com