पंकजांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या सुषमा अंधारे झाल्या उद्धव ठाकरेंसमोर भावूक!

प्रा. डॉ. सुषमा अंधारे यांनी आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदार नीलम गोऱ्हे यांच्याकडून हातात शिवबंधन बांधून घेतले.
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

पुणे : परळी येथे 2009मध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या प्रा. डॉ. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदार नीलम गोऱ्हे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले. त्यावेळी त्या भावूक झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी अंधारे यांनी शिवसेनेवर टीका केली होती. ( Sushma Andhare, who contested elections against Pankaja Munde, built Shiv Bandh: Uddhav Thackeray got emotional )

या प्रवेशाच्या वेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, आमदार नीलम गोऱ्हे, दिवाकर रावते, सचिन आहिर आदींसह शिवसेना नेते व शिवसैनिक उपस्थित होते. या प्रसंगी नीलम गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. अंधारे यांनी मागील 25 वर्षे आपले जीवन आंबेडकरी विचारांना समर्पित केले आहे. त्या आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. समाजात दुही माजविणारे हिंदुत्त्वापेक्षा शिवसेनेचा विचार हा राष्ट्र हिताचा आहे. प्रबोधनकारी हिंदुत्त्वाचा विचार आहे. शिवशक्ती व भीम शक्तीचा विचार बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी रुजविला. त्याचा अभ्यास करून सुषमा अंधारे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या बरोबर त्यांचे अनेक सहकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे, गोऱ्हे यांनी सांगितले.

Sushma Andhare
सुरेश माने, सुषमा अंधारे यांच्या राजकीय भवितव्याचे काय होणार?

सुषमा अंधारे म्हणाल्या, तुमच्या माझ्या जीवनाचा मुळाधार संविधानिक चौकट आहे. ही चौकट उद्वस्त करण्याचा पाश्वी खेळ भाजप करत आहे. ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग या सारख्या स्वायत्त यंत्रणा हाताशी धरून हा पाश्वीखेळ खेळला जात आहे. ते माझ्या सारख्या संविधान मानणाऱ्या, सजग, संविधान निष्ठ नागरिकाला स्वस्त बसून बघणे अशक्य आहे. त्यामुळे सातत्याने मला विचारले जात आहे की, तुमच्या सारखा पुरोगामी माणूस इकडे कसा काय? ज्या क्षणी उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं की, माझे हिंदुत्त्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्त्व नाही. त्याच क्षणी माझ्या बरोबर चांद्यापासून बांध्या पर्यंत जोडलेला मुस्लिम समाज, वंचित बहुजन आघाडीतील अतुल नागरे, राष्ट्रवादीच्या शितल केदारे, भाजपच्या पुण्यातील नगरसेविका किरण जठार आदी जण माझ्यासह शिवसेनेत येण्यास तयार झाले.

Sushma Andhare
सक्षणा सलगर आणि सुषमा अंधारे राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक

त्या पुढे म्हणाल्या की, मला बऱ्याच मुस्लीम बांधवांनी सांगितले की, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. कारण आम्हाला भाजपशी लढा द्यायचा आहे. माझ्या डोक्यावर ना ईडीच्या फायलीचे ओझे आहे, ना कुठले प्रलोभने आहेत. ज्या पद्धतीने मी बाबासाहेबांची लेक म्हणून राज्यभर लौकीक मिळविला त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकाची बहीण व लेक होण्याचा मी मनापासून प्रयत्न करेल. तीच जागा सर्वात मोठी आहे. मला शिवसेनेतील पीठा मीठाचे, चहा-साखरेचे डबे माहिती नाहीत. मी नवीन आहे. मला शिवसेनेतील रितीरिवाज माहिती नाहीत. नीलम गोऱ्हे नेहमीच माझ्या आदर्श राहिलेल्या आहेत. त्या मला आई सारख्या सांभाळून घेणाऱ्या आहेत. आज एका गटात गळे काढून रडायचे आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गटात शामील व्हायचे असेही होणार नाही, असा टोलाही त्यांनी शिंदे गटातील आमदार व खासदारांना लगावला.

त्यांनी शिवसेनेवर टीका केली होती. यावर त्यांनी सांगितले की, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कधीही बरा. आम्ही कधी काळी टीकाही केली असेल मात्र आज दिलदारपणे आमच्या एकच संविधानिक शत्रू बरोबर लढण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व मान्य करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Sushma Andhare
Sushama Andhare : राष्ट्रवादीतून शिवसेनेत येताच सुषमा अंधारेंना मिळालं मोठं गिफ्ट

नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या जय घोषात अंधारे यांना शिवबंध बांधले. त्यावेळी अंधारे भावूक झाल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. हातातील रुमालाने त्यांनी वाहणारे अश्रू टिपण्याचा प्रयत्न केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी तुम्हाला एक जबाबदारी देत आहे की, नीलम गोऱ्हे ज्या पद्धतीने महिलांना न्याय देत आहेत. त्याच पद्धतीने तुम्हीही महिलांना न्याय द्यावा. त्यांना महिला उपनेते पदाची जबाबदारी देत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणताच. भावूक झालेल्या अंधारे शिवसेना पक्ष प्रमुख व शिवसैनिकांसमोर नतमस्तक झाल्या.

सुषमा अंधारे या कायदेच्या विद्यावाचस्पती आहेत. त्या राज्यशास्त्र, समाजशास्त्र, कायदा या विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी 2009मध्ये पंकजा मुंडेच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या होत्या. त्यांनी वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही वर्षे काम केले आहे. वक्ता म्हणून त्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com