Raju Shetti News : राजू शेट्टींकडे जमीन किती? खोटा मेसेज करणाऱ्यांवर...; स्वाभिमानीची निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव

Hatkanangale Loksabha Constituency : 'अप्पा ग्रुप जयसिंगपूर' या व्हाॅट्सअॅप ग्रुपवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी 200 एकर जमीन खरेदी करून भ्रष्टाचार केला. अशा आशयाचा खोटा मजकूर पसरवून राजकीय हेतूने बदनामी केली जात आहे.
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama

Hatkanangale Political News : लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा दिवस जवळ येत आहे तस तसा निवडणुकीला अधिक रंग चढतो आहे. प्रचाराच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात येतो आहे तोच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. व्हाॅट्सअॅपवर व्हायरल झालेल्या मेसेजवरून थेट 'स्वाभिमानी'ने (Swabhimani) कारवाईची मागणी केली आहे.

व्हाॅट्सअॅपवर भ्रष्टाचाराचा खोटा मजकूर पसरवून राजकीय हेतूूने बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (swabhimani shetkari sanghatana) वतीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.

Raju Shetti
Loksabha Election 2024 : संजय राऊतांचे मोठं विधान; विशाल पाटलांना संसदेत, तर नारायण राणेंना तिहार जेलमध्ये पाठविणार...

'अप्पा ग्रुप जयसिंगपूर' या व्हाॅट्सअॅप ग्रुपवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju shetti ) यांनी 200 एकर जमीन खरेदी करून भ्रष्टाचार केला. अशा आशयाचा खोटा मजकूर पसरवून राजकीय हेतूने बदनामी केली जात आहे, असे 'स्वाभिमानी'कडून निवेदन निवडणूक अधिकाऱ्याला देण्यात आले आहे.

रोहित पाटील याने व्हाॅट्सअॅप ग्रुपवरून खोटी माहिती पसरवली आहे. वास्तविक राजू शेट्टी यांची मांडूकली येथे साडेआठ एकर जमीन असून, ही माहिती राजू शेट्टी यांनी गत लोकसभा निवडणूक शपथपत्रात दिलेली होती.

असे असताना इतर शेतकऱ्यांची नावे घालून शेट्टी यांनी 200 एकर जमीन घेऊन भ्रष्टाचार केला, असे नमूद करून सर्वत्र खोटी माहिती पसरवली जात आहे. या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केली आहे.

(Edited By Roshan More)

R

Raju Shetti
Parli Vaijnath Political News : 'संस्था बंद पाडून मुंडे भावंडांनी परळीचा रोजगार पळविला'; कराडांचा गंभीर आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com