Kolhapur Entry Tax Proposal : कोल्हापूरमधून हद्दपार झालेला टोल पुन्हा जनतेच्या माथी? MH 09 वगळून सर्व वाहनांवर कर लावण्याचा महापालिकेचा प्रस्ताव

Raju Shetti Criticizes Kolhapur Entry Tax Proposal : कोल्हापूर शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या आणि बाहेरील वाहनांवर 'प्रवेश कर' (टोल) आकारण्यात यावा असा ठराव नगरसेवकांनी दाखल केला आहे.
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या आणि बाहेरील वाहनांवर 'प्रवेश कर' (टोल) आकारण्यात यावा असा ठराव नगरसेवकांनी दाखल केला आहे. या ठरावात MH-09 म्हणजेच कोल्हापूर जिल्हा पासिंगच्या वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व वाहनांवर ‘प्रवेश कर’ लावण्यात यावा असे म्हटले आहे. जर असे झाले तर कोल्हापुरात येणाऱ्या परजिल्ह्यातील आणि परराज्यातील वाहनांना प्रवेश कर लागू केला जाणार आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून यावरून नाराजीसह संताप व्यक्त होताना दिसत आहे.

दरम्यान या ठरावाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला आहे. तसेच महापालिकेने टोल वसुलीचा 'तुघलकी' निर्णय घेण्यात येवू नये असा इसारा दिला आहे. तर माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावरून कारभाऱ्यांनी महापालिका लुटली, आता टक्केवारी अन् भ्रष्टाचारासाठी जनतेच्या खिशावर दरोडा? टाकण्याचा प्रकार असल्याचे म्हणत टीका केली आहे.

शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या आणि बाहेरील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असल्याचे सध्याचे चित्र असून अनेकदा वाहतूक कोंडीही होताना दिसते. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिका क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या जिल्हा बाहेरील इतर सर्व वाहनांवर ‘प्रवेश कर’ लावण्याचा ठराव महापालिकेला आला आहे. याबाबत नगरसेकांनी ठराव केला असून MH-09 पासिंग वगळून इतर वाहनांना तो लागू करावा असे म्हटले आहे. हा ठराव 17 जून रोजी महासभेत दाखल करण्यात आला.

Kolhapur Municipal Corporation
'साखरेचा ट्रक अडवणार आणि...'Raju Shetty यांची कारखानदारांना ताकीद ।Solapur News।

जर महासभेने याला मंजूरी दिली तर कोल्हापुरात येणाऱ्या परजिल्ह्यातील आणि परराज्यातील वाहनांना प्रवेश कर भरावा लागाणार आहे. आता या ठरावावरून नवा वाद सुरू झाला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं याला विरोध केला आहे. यावरूनच खासदार राजू शेट्टी यांनी देखील संताप व्यक्त करत महापालिकेनेही जनतेला लुटण्यासाठी हा नवा फंडा शोधून काढला आहे. जनतेवर टोलचा भार टाकण्यापेक्षा महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी आपली 'टक्केवारी' आणि 'भ्रष्टाचार' थांबवावा अशी खरमरीत टिका केली आहे.

नगरसेवकांनी हा ठराव आणताना प्रशासनाने कोणताही ठोस अभ्यास केलेला नाही. केंद्र आणि राज्य सरकार आधीच जीएसटी (GST) च्या माध्यमातून जनतेकडून मोक्कार करवसुली करत असताना, आता महापालिकेनेही जनतेला लुटण्यासाठी हा नवा फंडा शोधला आहे. जनतेवर टोलचा भार टाकण्यापेक्षा महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी आपली 'टक्केवारी' आणि 'भ्रष्टाचार' थांबवावा असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे.

तसेच महापालिकेत सध्या विकासकामांची अंदाजपत्रके जाणीवपूर्वक फुगवून त्यातून स्वतःची टक्केवारी काढायची आणि दुसरीकडे शहराच्या विकासाचे नाव पुढे करून सर्वसामान्य जनतेच्या माथी टोल मारायचा, ही अत्यंत घाणेरडी व चुकीची पद्धत सुरू आहे. कोल्हापूर महापालिकेच्या भ्रष्ट कारभाऱ्यांनी आजवर महापालिका दोन्ही हातांनी लुटली आहे. आता या कारभाऱ्यांना त्यांच्या टक्केवारी आणि भ्रष्टाचारासाठी पैसा कमी पडू लागल्यानेच, त्यांनी हा कर आकारणीचा घाट घातला आहे, असा थेट आणि घणाघाती आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

महापालिकेने केवळ 'MH 09' (कोल्हापूर) पासिंग वगळता इतर सर्व वाहनांवर कर लावण्याचा घाट घातला आहे. परंतु, कोल्हापूर जिल्ह्यातीलच नवीन पुनर्रचित इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळ या तालुक्यांतील वाहनांचे पासिंग 'MH 51' आहे. हे लोक रोज विविध कामांसाठी, बाजारपेठेसाठी आणि उपचारांसाठी कोल्हापूर शहरात येतात. जिल्ह्याचेच नागरिक असलेल्या या 'MH 51' धारकांवर आणि इतर कोणत्याही वाहनावर अशा प्रकारे अन्यायकारक टोल लादणे अत्यंत अन्यायकारक आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रचंड तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, जनक्षोभ उसळला आहे.

Kolhapur Municipal Corporation
Raju shetty : शिखंडीचा डाव...सरकारच्या कमरेला चड्डी ठेवणार नाही; राजू शेट्टींच्या इशाऱ्याने आंदोलन चिघळणार

स्वाभिमानी शेतकरी संघटना या जनविरोधी निर्णयाला पूर्ण ताकदीने विरोध करत आहे. कोल्हापूर शहरात येणाऱ्या केवळ 'MH 51' च नव्हे, तर कोणत्याही वाहनाला टोल किंवा प्रवेश कर आकारू नये, ही आमची ठाम मागणी आहे. महापालिका प्रशासनाने हा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास, इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून महापालिकेच्या विरोधात तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल. यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णपणे महापालिका प्रशासन आणि येथील भ्रष्ट कारभारीच जबाबदार असतील!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com