Raju Shetti News : स्वाभिमानी उतरणार रस्त्यावर; साखर वाहतुकीस विरोध करणार, काय आहे कारण?

Swabhimani Protest : कोल्हापूर, सांगलीसह कर्नाटकातील कारखान्यांवरही 'आत्मक्लेश'
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर

Kolhapur Political News : गेल्या वर्षाच्या हंगामातील गाळप झालेल्या प्रतिटन उसाला चारशे रुपये ज्यादा दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मंगळवारपासून रस्त्यावर उतरणार आहे. कारखान्याची साखर रोखली जाणार असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यांवर चारशे रुपये जमा होत नाहीत, तोपर्यंत कारखान्याची धुराडे पेटू देणार नाही, असा सज्जड दम स्वाभिमानीचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. (Latest Political News)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे २२ दिवस आत्मक्लेश आंदोलन असणार आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील आणि कर्नाटकातील साखर कारखान्यांवर ५२२ किलोमीटर चालून आत्मक्लेश करणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. यंदा स्वाभिमानी संघटनेची २२ वी ऊस परिषद ७ नोव्हेंबरला होणार आहे. यापूर्वीच स्वाभिमानी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Raju Shetti
Pankaja Munde News : 19 कोटी थोबाडावर मारू म्हणणारे पंकजाताईंचे समर्थक लागले कामाला; कारखान्यासाठी चेकवर चेक

कारखान्यातून मंगळवारपासून साखर बाहेर पडू देणार नाही, असा इशारा देत वाहतूकदारांना साखर वाहतूक न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच वाहतूक झाल्यास आंदोलनात होणाऱ्या नुकसानीस ते स्वतः जबाबदार असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षीचे 400 रुपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा शेट्टींनी दिला. (Maharashtra Political News)

यावर्षीचे साखरेच्या दराचे आंदोलन गांधीगिरीच्या मार्गाने करणार आहे. १७ ऑक्टोबरपासून ७ नोव्हेंबरपर्यंत आत्मक्लेश आंदोलन होईल. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कारखान्यांवर पायी जाणार असून, २२ दिवस हे आंदोलन सुरू असणार आहे. हे आत्मक्लेश आंदोलन ५२२ किलोमीटर असणार आहे. कर्नाटकातील साखर कारखान्यांनादेखील तोच नियम लावणार आहे. कर्नाटकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानीचे आणि कर्नाटक रयत संघाचे आंदोलन असणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.

(Edited by Sunil Dhumal)

Raju Shetti
Devendra Fadnavis News: 'मिशन 45' साठी फडणवीसांनी विस्तारकांना सांगितला प्लॅन; म्हणाले, 'पुढील एक वर्षाचा...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com