Raju Shetti News : राजू शेट्टींचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल ; म्हणाले,'' लबाड लांडगं ढोंग करतंय, गतिमान...''

Swabhimani Shetkari Sanghtana : '' गतिमान वेगवान सरकार असल्याच सोंग करतंय...''
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Raju Shetti
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : राज्यात सत्तेत आल्यापासून शिंदे-फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यात राज्यातील शेतकऱ्यांना केवळ १ रुपयांत पीक विमा तसेच केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यांचा समावेश आहे.

तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली होती. मात्र, यापैकी कोणत्याही योजनेचा व मदतीचा लाभ शेतकऱ्यांना झाला नसल्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सत्ताधारी- विरोधक यांच्यात झडत असतात. याचवेळी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राजू शेट्टी(Raju Shetti) यांनी शिंदे फडणवीस सरकारवर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. शेट्टी म्हणाले, लबाड लांडगं ढोंग करतंय,गतिमान वेगवान सरकार असल्याचं सोंग करतंय. पीकविमा मिळेना , ऊसाचा अंतिम हप्ता ठरेना , प्रोत्साहनपर अनुदानाच तर मेळच लागेना. म्हणूनच सांगतो, शेतकऱ्यांनो कोल्हापूरच्या जनता दरबारात याचा जाब विचारायला यायला लागतंय असं शेट्टी म्हणाले आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Raju Shetti
Raju Shetti's Big Announcement : राजू शेट्टींची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मोठी घोषणा

शेट्टी काय म्हणाले?

स्वाभिमानी शेतकरी संघटने(Swabhimani Shetkari Sanghtana )चे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिंदे-फडणवीस सरकार(Shinde Fadnavis Government))च्या शेतकऱ्यांचा पीकविमा, प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या घोषणेवरुन आगपाखड केली आहे. '' गतिमान वेगवान सरकार असल्याच सोंग करतंय. पिकविमा मिळेना , उसाचा अंतिम हप्ता ठरेना , प्रोत्साहनपर अनुदानाच तर मेळच लागेना. म्हणूनच सांगतो शेतकऱ्यांनो, कोल्हापूरच्या जनता दरबारात याचा जाब विचारायला यायला लागतंय असं ट्विट शेट्टी यांनी केलं आहे.

...म्हणून शेतकऱ्यांना मोठा फटका!

राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेत निवेदन दिले होते. त्यात राज्य सरकारने ऊस दर नियंत्रण समिती न नेमल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. सरकारला आम्ही गेल्या वर्षभरापासून या संदर्भात वेळोवेळी ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती शेट्टी यांनी दिली होती.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Raju Shetti
Devendra Fadanvis on NCP: शरद पवारांनी भाकरी फिरवली नाही...; फडणवीसांचं मोठं विधान

...म्हणून शेतकऱ्यांना मोठा फटका!

राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेत निवेदन दिले होते. त्यात राज्य सरकारने ऊस दर नियंत्रण समिती न नेमल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. सरकारला आम्ही गेल्या वर्षभरापासून या संदर्भात वेळोवेळी ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com