Shetkari Sanghatana | MLA  Jayant Patil
Shetkari Sanghatana | MLA Jayant Patil Sarkarnama

INDIA Alliance : इंडिया आघाडीला 'स्वाभिमानी'ची साथ ; जयंत पाटलांनी सांगितली रणनीती

Swabhimani Shetkari Sanghtana : सरकार आणि विरोधक मराठा समाजाची फसवणूक करत आहे.
Published on

Kolhapur Political News : किमान आधारभूत किंमतीच्या (MSP) मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी 'इंडिया' आघाडीबद्दलची भूमिका वेटिंग वर ठेवली होती. मात्र शेतकरी संघटनेचे व आमदार जयंत पाटील यांनी राजू शेट्टींची भूमिका आता जगजाहीर केली आहे. प्रागतिक विकास मंचाची आज बैठक कोल्हापुरात पार पडली. त्या निमित्ताने आमदार जयंत पाटील कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला.

आमदार जयंत पाटील यांनी प्रागतिक विकास मंचाची भूमिका स्पष्ट करताना, प्रागतिक विकास मंच आघाडी दोन वर्षांपूर्वीची आहे. आमचा पराभव झाला यावर विचार मंथन करून हा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीचा आम्ही घटक पक्ष आहे. त्यामुळे इंडियामध्ये सुद्धा आमचा सहभाग आहे. असे आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Shetkari Sanghatana | MLA  Jayant Patil
Maratha Aarakshan Andolan : मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन अर्जुन खोतकर उपोषणकर्ते जरांगे पाटील यांच्या भेटीला, सरकार मोठा निर्णय घेणार ?

संविधान वाचवण्यासाठी आणि संरक्षणासाठी आम्ही एकत्र

आमचा विरोध पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे. येणारी निवडणूक वेगळी आहे. आम्ही भाजपासोबत जाणार नाही. आमचा विचार पक्का आहे. राजू शेट्टी यांचीही भूमिका तीच आहे. त्यामुळे तेही इंडिया सोबत आहेत. 'एमएसपी' बाबतची भूमिका राजू शेट्टींचा गाभा आहे. ते प्रागतिक सोबत ते राहतील, लोकसभेबाबत आम्ही काही जागांची मागणी करणार असल्याचेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

आरक्षणाची 50 टक्केची अट रद्द करावी

सरकार आणि विरोधक मराठा समाजाची फसवणूक करत आहे. घटनेत बदल करूनच आरक्षण द्यावे लागणार आहे. ओबीसीमधून आरक्षण शक्य नाही. त्यामुळे आरक्षणाची 50 टक्के अट रद्द करावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com